लॉकडाऊन पूर्णपणे उठवला नाही, काही अटी शिथिल केल्या – विजय वडेट्टीवार

नागपूर : ७ जून – कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य आहे. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. फक्त काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, असं मोठं विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अनलॅाकिंगला सुरुवात झाली आहे. पण पूर्णपणे अनलॅाक करण्यात आलेलं नाही. तर काही अटीच शिथिल केल्या आहेत. एकूण ४३ युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी १८ युनिटलाच अनलॅाकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Leave a Reply