कीर्तनकाराने केली बायकोला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

ठाणे : ७ जून – कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला कैटुंबिक आणि अद्यामिक ज्ञान देणारा ८५ वर्षीय कीर्तनकार बायकोच्या जीवावर उठल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-मलंगगड मार्गावरील द्वारली गावात घडली आहे. हा कीर्तनकार बुआ आपल्या ८० वर्षाच्या वृद्ध बायकोला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला. त्यांनतर मारकुट्या कीर्तनकाराला हिललाईन पोलिसांचे पथक शोधायला त्यांच्या घरी गेले असता बुआ आळंदीला गेल्याचे समजल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. हभप गजानन बुआ चिकणकर, असे या कीतर्नकाराचे नाव आहे.
आठवड्याभरापूर्वी पाण्याच्या वादातून कीर्तनकार गजानन चिकणकर यानी बायकोशी वाद घातला होता. त्यानंतर नवरा-बायकोमध्ये बाचाबाची होऊन कीर्तनकाराच्या हातात असलेल्या बदलीनेच आपल्या बायकोला बेदम मारहाण केली. यावेळी कुटूंबातील महिला सदस्य उपस्थित असूनही या कीर्तनकारला काहीच बोलले नाही. मात्र, आपल्या आजीला आजोबा बेदम मारहाण करीत असल्याचे ८ वर्षाच्या नातवाने पहिले आणि त्याने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून ठेवला.
द्वारली गावातील हा मारहाणीचा व्हिडिओ देशभरात भलताच व्हायरल झाला. हा व्हिडिओ स्थानिक हिललाईन पोलिसांनी पाहिल्यावर पोलीस पथकाने गजानन बुवा चिकनकर यांचे घर गाठले. मात्र, बुआ आळंदीला गेल्याची माहिती घरच्यांनी पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे कीर्तनकार नवऱ्याने बेदम मारहाण करूनही बायकोने मात्र याप्रकरणी काही तक्रार नसल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या कुटुंबियांना समज दिली असून गजानन बुवा आल्यानंतर त्याला देखील समज दिली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर दुसरीकडे व्हायरल व्हिडीओच्या आधारे हिलालाईन पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करीत असून त्यांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply