अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर केला अत्याचार, आरोपी अटकेत

नागपूर : ७ जून – अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना देवलापार येथे उघडकीस आली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अत्याचारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजकीय दबावामुळे अद्याप अत्याचारी युवकाला अटक करण्यात आलेली नाही,अशी चर्चा आहे.
वैभव राऊत (वय २३ रा. नवेगाव चिजदा),असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. वैभव हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रसचे तालुका अध्यक्ष कैलास राऊत यांचा मुलगा आहे.
वैभव याने देवलापार परिसरात राहणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने तिला अश्विन कुंभरे याच्या रिसॉर्टवर नेले. तेथे चहातून तिला गुंगीचे औषध दिले. तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने मोबाइलद्वारे तरुणीची अश्लील चित्रफित तयार केली. ही अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन वैभव हा तिच्यावर सतत अत्याचार करायचा.
काही दिवसांपूर्वी त्याने तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. तरुणीने देवलापार पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वैभव याला अटक न करण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply