सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

अशी ही पळवापळवी

निवडणूक पुर्व युती करून मोदी च्या नावाने ५६ जागा जिंकून, मतदारांच्या पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसून, हिंदुत्वाचे नेसु सोडून लांड्या पायजाम्याच्या नाड्या बांधून, निवडणूक पुर्व युती तोडुन, नितीमत्ता वेशीला टांगून भाजपा सोडुन, आपली वेगळी चूल मांडत, साहेब नव्या युती च्या नितीमत्तेवर भाषणवजा पत्रकार परिषद घेण्यासाठी, आपल्या दोन चार टाळ्या वाजवणा-या पिलांटुना गर्दीत बसवून आसनाधीन झाले…..
अबब केवढी मोठी प्रस्तावना !!!!

“दुस-या सांगे दिव्य ज्ञान, आपण कोरडे पाषाण”
तर साहेब “खेड” चे सहा कार्यकर्ते समयाधीशांच्या पक्षाने पळविले म्हणून हा पत्रकार परिषदेचा घाट आणि मुसलमानांना आरक्षण दिले, मराठा आरक्षण संघर्षाची ठिणगी पाडुन, ते रद्द करण्यात यशस्वी झालो तरीही आमचे हिंदुत्व कायम आहे हे दाखवण्यासाठी मानसिक रित्या ढासळलेल्या मानसिक नितीमत्तेच्या शरीरावर घातलेला मानेवरील “भगवा पंचा”. आपला दिल्ली चा “खासीराम कोतवाल” जसा इफ्तार पार्टीत गेला की खांद्यावर अरबी पंचा आणि डोक्यावर गोल टोपी घालून जेवायला बसतो, त्याप्रमाणे साहेब गळ्यात भगवा पंचा घालून बसलेले, पत्रकार परिषदेत.
साहेब कळले बरं!!!! तुम्हाला काय सांगायचे आहे ते!!!!!!

पहिलाच् मुद्दा साहेबांनी मांडला तो म्हणजे भाजपा आणि आमच्यात सत्तेत असणारी नितीमत्ता. आमचे कधी भाजपा ने पळविले नाही आणि आम्ही कधी भाजपा चे गडी पळवले नाही.
शुक्र है जनाब साहब, देढ साल बाद सही, आपको भाजपा याद आई और वो भी निती का पाठ पढाने के उदाहरण के तौरपर……जनाब साहब, तुम्ही सत्तेत असताना भाजपा बरोबर, किती ही टिमक्या वाजवल्या, आक्रस्ताळेपणा केला तरीही भाजपाला माहिती आहे की ह्या बाळाला कसं पाळायचं पण आता ज्यांच्याशी तुम्ही चुल मांडली आहे, तुमची पालघर संतांची हत्या, वाझे, परमवीर ह्यांना शिजविता शिजविता चुलीने केव्हा पेट घेतला, कोणालाच् कळले नाही.
नितीमत्ता गमावून घेतलेली सत्ता अतिशय विदारक असते, भयावह असते. कधी कोणाला राजीनामा द्यायला लावेल आणि कोणाला उध्वस्त करेल? ….. काही कोणाची काळवेळ ठरलेली नाही.
आज तुमच्या रडवेल्या चेह-याची पत्रकार परिषद पाहिली आणि राजकुमार आठवला….जानी ssssss जिनके घर शिशेके होते है……
हा आठ पैकी सहा नेले हा वाद खरे तर चव्हाट्यावर न येवू देता, त्या पार्टीच्या शिर्ष नेतृत्वाशी बोलुन, बोभाटा न होता मिटविता आला असता.
पण जनाब साहेब, तुम्हीच् सर्व जगाला घसा फोडून सांगितले की वाघाचे गडी दहशत दाखवून आणि पैशाचे आमिष दाखवून पळवून नेले.
जनाब साहेब, कुठली नितीमत्ता सांगताय??????? आमचे कार्यकर्ते, वाघाच्या संरक्षणाखाली असलेले कार्यकर्ते, दहशतीने पळवून नेले???? म्हणजे फुटीर वाघाचे फट्टु कार्यकर्ते, म्हणायचे आहे की काय!!!!!!! आणि पैशाने विकत घेतले….. म्हणजे तुम्हाला म्हणायचे काय आहे? स्वतः च्या पक्षाचे कार्यकर्ते पैशाने विकत घेता येवू शकतात आणि दहशतीने पळवून नेता येते. अरे साहेब, तुम्ही पण तर हेचं केले भाजपा बरोबर, तर तुमच्या कार्यकर्त्यांनी केले काय बिघडले??? यथा राजा तथा प्रजा!!!!!!! वही पाओगे जो बोओगे !!!!!!
साहेब….. आठवा आठवा जरा नोव्हेंबर महिना २०१९ . टीव्ही ला मागल्या वीस वर्षांत नाही मिळाली, तितकी टीआरपी, एका महिन्यात मिळाली ती तुमच्या ५६ लोकांच्या पळुन जाण्याने, भाजपा च्या भाषेत ,”हमारा पुरा अस्तबल चोरी हो गया”
आणि तुमची हाकाटी सहा पळाले आणि व्यथा आमच्या तुन गळाले…… रडा धाय मोकलुन रडा…..
तुम्हीच म्हणता मेलेल्याचं राजकारण करु नका…. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथेची नाटकं…… हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते मरणोपरांत “जनाब बालासाहेब ठाकरे” हा प्रवास काय दर्शवतो?
जनाब साहेब, दीड वर्षापूर्वी ची ती तुमची तडफ, मिळणा-या पदाची असलेली चमक, आणि तुमची रया ह्या सगळ्या गोष्टींची जागा आता तुमच्या चेह-यावरील चिंता, मुद्दाम भगवा पंचा गळ्यात टांगून (हो मुद्दाम हा वापरला) तुमच्यातली गेलेली हिंदुत्वाची चमक आणि तुमच्या वेगळ्या चुलीची जळती रया, हेचं दाखवते की सगळे आलबेल नाही.
आज जरी समयाधीश तुम्हाला आपल्या बाजुला बसवंत असतील तरी कामापुरता मामा – समयाधीशांची रणनीती….आणि तुमची दौड समयाधीशांपर्यंत – आणि तुमची चलती, तुमचा चोथा होतपर्यंत….. कुठपर्यंत चालते तुमचे गु-हाळ वाट बघायची – पडझड होते की तडजोड?????
कालाय तस्मै नमः म्हणंत पुढे सरकायचे.

भाई देवघरे

Leave a Reply