वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

ट्विटरचा माज ….

टिवटिव करणाऱ्या ट्विररला
एवढा चढलाय माज , की,
प्रत्यक्ष उपराष्ट्रपतींच्या खात्यावर
टाकलिय त्याने गाज !

देशाच्या कायद्यांनाही
हे टिवटे जुमानत नाही
पण त्यांना हे माहीत नाही , की,
भारत आज ‘बनाना रिपब्लिक’नाही!

भारत हे सार्वभौम शक्तिशाली राष्ट्र आहे
इथले कायदे मानावेच लागतील
नाहीतर आम्हालाही ” चले जावं “चे आदेश द्यावे लागतील!

उपराष्ट्रपती हा देशाचा मानदंड आहे
त्यांचा अवमान हा राष्ट्राचा अवमान आहे !
त्यामुळे तुमची कृती केवळ चूकनाही
तो एक जघन्य अपराध आहे !
चुकीची माफी होऊ शकते, पण,
अपराधाला क्षमा नाही !

माफ केल्यास यांचा माज
असाच वाढत जाईल,आणि मग
अनेक ‘ ईस्ट इंडिया कंपन्यां’चा
इथे पुन्हा उदय होईल !

कवी ... अनिल शेंडे

Leave a Reply