तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने उमरियात उडाली खळबळ

भोपाळ : ६ जून – मध्य प्रदेशातील उमरिया येथून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे एका 28 वर्षांचा तरुण जबर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवर बँकसारख्या दिसणाऱ्या डिव्हाइसमध्ये ब्लास्ट झाला अद्याप ब्लास्ट झालेलं डिव्हाइस पॉवर बँक होतं की अन्य काही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सब डिव्हिजनल ऑफिसर ऑफ पोलीस भारती जाट यांनी सांगितलं की, पीडित राम साहिल पाल याला पॉवर बँकसारखी एक वस्तू घरातील शेतात पडलेला मिळाला. त्यांनी पुढे सांगितलं की, रामने आपल्या शेजारच्यांच्या घरी जाऊन जेव्हा डिव्हाइसमध्ये चार्जरसह आपला मोबाइल लावला तर मोठा स्फोट झाला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात राम गंभीर झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घटनास्थळी सापडलेलं डिव्हाइस फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये तपासासाठी पाठविण्यात आलं आहे. ज्यातून हा पॉवर बँक होता की अन्य वस्तू याबाबत नेमका खुलासा होईल. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा डिव्हाइस एक्सप्लोसिव नव्हता. तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply