संपादकीय संवाद – महाआघाडी सरकारचे आता काही खरे दिसत नाही

महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्यामुळे महाआघाडी सरकारचे आता काही खरे दिसत नाही. एकीकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री बाजूला सारत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार श्रेय घ्यायला धावता आहेत आणि त्याच वेळी मुख्यमंत्री त्यांना तोंडघशी पडत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत उपमख्यमंत्री अजितदादा पवारांना तुमच्या आमदारांना आवरा असा दम भरत आहेत. तरीही आमच्यात समन्वय आहे आणि आम्ही ५ वर्ष सरकार चालवू असा दावा महाआघाडीच्या नेते करत आहेत. एकूणच सगळा चिंताजनक प्रकार आहे.
झाले असे की राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्यात राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यात हटवण्याचे निश्चित झाले, या बैठकीला उपस्थित असलेले मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्साहात बाहेर येत पत्रपरिषद घेतली आणि सर्व निर्णय जाहिर करून टाकले.
वस्तुतः असे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतात अशी प्रथा आहे. मात्र ही प्रथा धाब्यावर बसवत वडेट्टीवारांनी श्रेयवादाच्या लढाईत एक पाऊल पुढे टाकले मात्र ही बाब मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरेंना चांगलीच खटकली त्यांनी लगेच आपल्या जनसंपर्क कार्यालयाला सूचना केली आणि अद्याप निर्णय झालेले नाहीत प्रस्ताव विचाराधीन आहेत असा खुलासा करायला सांगितले. हा खुलासा येताच वडेट्टीवार चांगलेच तोंडघशीं पडले त्यांना सारवासारव करावी लागली.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खुलाश्यानंतर ३० तासांनी राज्यसरकारने लॉक डाऊन उठवण्याबाबतचा कार्यक्रम एका ध्यादेशाद्वारे जाहीर केले. या अध्यादेशात आणि वडेट्टीवारांनी दिलेल्या माहितीत फारसा काही फरक नव्हता. मग उद्धवपंतांनी थोडा मानवः मोठेपणा दाखवून वडेट्टीवारांच्या घोषणेवर शिक्कामोर्तब करायला काहीच हरकत नव्हती या संदर्भात समाजमाध्यमांवर एक सासू सुनेचा किस्सा व्हायरल होतो आहे. एका घरात एक भिकारी भिक्षा मगयोला येतो त्यावेळी समोर असलेली सून भिक्षा मिळणार नाही म्हणून त्याला परत पाठवते ते एकूण सासू बाहेर येते आणि सुनेला भिकाऱ्याला परत बोलवायला सांगते भिकारी येताच सासू त्याला सांगते की तुला भिक्षा मिळणार नाही,भिकारी गेल्यावर सासू सुनेला ऐकवते की आज भिक्षा मिळणार नाही हे सांगण्याचा अधिकार माझा आहे, तू तो अधिकर हातात घेऊ नये तसेच, उद्धव पंतांनी आपल्या कृतीतून वडेट्टीवारांना जाणवून दिलेले आहे.
वडेट्टीवार हे काँग्रेसचे मंत्री आहेत. महाआघाडी सरकारच्या नेत्यांनी सरकार गठीत झाल्यापासून काँग्रेस पक्षाला कायम दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेल्या घोषणांना कधी उद्धव ठाकरे तर कधी अजित पवार ब्रेक लावतात काँग्रीसचे राष्ट्रीय प्रभारी एच के पाटील उद्धव ठाकरेंना भेटून सोनिया गांधींचे पत्र देतात त्यालाही किंमत दिली जात नाही. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाणांना आणायचं खर पण तिथेही शरद पवारांनी मांजर आडवी पाठविल्याचीमाहिती आहे, त्यामुळेच काँग्रेसचे दोन्ही मित्रपक्षांशी जमेनासे झाले आहे. म्हणूनच प्रदेशाक्ष्यक्ष नाना पटोलेंनी आगामी निवडणुका स्वबळावर लढून सत्ता मिळवण्याची घोषणा केली आहे. त्यांना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणि आता भरीस भर म्हणजे पुणे जिल्ह्यातील खेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे आणि शिवसेनेचे बऱ्यापैकी फाटले आहे त्यामुळे आमदाराला आवरानाहीतर पुढच्या निवडणुकीत खेमध्ये शिवसेनेचा आमदार असेल अशी धमकी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. तरीही सर्वकाही आलबेल असल्याचा दावा केला जातो आहे.
हे सर्व बघता महाआघाडी सरकारचे आता काही खरे नाही हे स्पष्ट दिसते आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply