मेहुण्याने जावयाची केली धारदार शस्त्राने हत्या

भंडारा : ५ जून – बहिणीला सतत त्रास का देतोस असे म्हणत जावयाची मेहुण्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना येथील कस्तुरबा वार्डात 5 जून च्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतले आहे.
मंगल अमर मोगरे (३०) रा.कस्तुरबा वार्ड, भंडारा असे मृताचे नाव आहे. सुशील संजू संदेश (३३) असे आरोपीचे नाव आहे. मंगल हा आपल्या पत्नीला नेहमी मारहाण करुन त्रास देत होता. पत्नीने हा प्रकार भाऊ सुशील याला सांगितला. त्याने अनेकदा मंगलची समजूत काढली. पण त्याने त्रास देणे थांबवले नाही. शुक्रवारी रात्री मंगल घरी एकटा होता. ही संधी साधून सुशील त्याच्या घरी गेला. काही कळायच्या आत धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार केला. त्या तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येतच त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची भंडारा पोलिसांना देण्यात आली. प्रभारी ठाणेदार बंडोपंत बन्सोडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तो पर्यंत आरोपी पसार झाला होता. शनिवारी सकाळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

Leave a Reply