वर्धा : ५ जून – वर्धेलगत दहेगाव येथे झालेल्या भीषण अपघातात मंडळ अधिकारी बाबाराव हिम्मतराव पांडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, अन्य तीन कर्मचारी गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी रात्री १० वाजता ही दुर्घटना घडली.
प्राप्त माहिती नुसार पांडे व अन्य कर्मचारी एका कारमधून लोणसावली येथून निघाले होते. वाटेत स्वतः चालक असलेल्या पांडे यांचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट मोठ्या नाल्यात पडली व उलटल्याने घडलेल्या दुर्घटनेत, पांडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य मंडळ अधिकारी मोहम्मद शफी तसेच सुनील गुडे व सुयोग्य कांबळे यांनी गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार कोलापे यांनी दिली आहे.