महागायिका वैशाली माडे हीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : ३ जून – गायिका वैशाली माडे हिने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेसह राष्ट्रावदीचे पदाधिकारी उपस्थित होते.
वैशाली माडे ही हरहुन्नरी प्रतिभावान गायिका आहे. आजवर तिने अनेक लाईव्ह इव्हेन्टसह चित्रपट गीते आणि मालिकांची शीर्षक गीते गायिली आहेत. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा हे तिचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते.
वैशाली माडे हिची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply