डॉक्टर कोडवाणी यांच्यावर कारवाई करा, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

भंडारा : ३ जून – शहरात कोरोनाचे थैमान सुरू असताना डॉ. कोडवाणी कोविड केअर सेंटर या खासगी रुग्णालयाने शासनाचे नियम पायदळी तुडवून रुग्णांची लुबाडणूक केली अशा तक्रारी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या. ही लुबाडणूक तत्काळ थांबविण्यात यावी. सदर प्रकरणी रुग्णालयाची चौकशी करून संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा येत्या सात दिवसात शिवसेनेतर्फे  आंदोलनान करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात उपचाराविना कुणाचीही हेळसांड होऊ नये व प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाद्वारे खासगी रुग्णालयांकरिता ८0 व २0 टक्के दराचे धोरण राबविण्याचे निर्देश दिले होते. नियमानुसार रुग्णालयातील एकूण बेड्सच्या ८0 टक्के बेड हे शासनाने ठरवून दिलेल्या दराने तर २0 टक्के बेड हे रुग्णालय व्यवस्थापनाच्या निर्धारित दराने रुग्णांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 
कोविड रुग्णांच्या वाढिव बिलासंदर्भात मागील काही दिवसांपासून शिवसेनेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. तुमसर शहरातील डॉ. गोविंद कोडवाणी यांच्या खासगी रुग्णालयाने ५0 टक्केपेक्षा जास्त रुग्ण २0 टक्के दरानुसारच दाखल केले. अर्थात रुग्णांची लुटमार केली जात असल्याचा आरोप रुग्णांचा नातेवाईकांसह शिवसेनेने केला आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी डॉ. गोविंद कोडवणी यांनी स्वतः रुग्णालयात बसून एका खाजगी न्यूज पोर्टल ला माहिती देतांनी सांगण्यातले की, कोरोना संसर्गजन्य काळात आमच्या रुग्णालयाकडून आठ हजार रुग्णांवर उपचार करून सदर रुग्णांना रिकवर अर्थातच दुरुस्ती केल्याचे सांगितले आहे, एकूणच रुग्णालयाकडून याबाबत जनतेची दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
सदर नियमाची पायमल्ली करून जनतेची होणारी लुबाडणूक रोखण्याच्या संदर्भाने शिवसेनेने जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मंगळवारी निवेदन दिले. यावेळी निवेदन सादर करताना शिवसेनेचे अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखील कटारे, तुषार लांजेवार सह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply