जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आरोपी अटकेत

वर्धा : ३ जून – एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अट्टल गुन्हेगार आरोपिने वारंवार बलात्कार केल्याची घटना पोलिसांत नोंद झाली असून सदर प्रकरणी आरोपी विशाल उर्फ वांढुर वसंत उरवते(१९) रा.संत कबीर वार्ड याचेवरती अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरुन पोक्सो एक्टसह बलात्कार केल्याच्या कलमान्वये गुन्हा नोंद करीत चोरी केलेल्या दोन दुचाकीसह अटक केली.
आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर घरफोडी,मोटरसायकल चोरीचे गुन्हे दर्ज आहेत,उपरोक्त आरोपीने यवतमाळ, वरोरा,नागपुर,बुटिबोरी इत्यादि ठिकाणी घरफोडी तर हिंगणघाट पांढरकवड़ा येथून दोन पल्सर दुचाकी वाहनचोरी असे गुन्हे केले आहेत. जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेने आपल्या आईसह हिंगणघाट पोलिसांत पोचुन काल दि.२ रोजी सायंकाळी तक्रार नोंद केली.आरोपीने प्रसंगी पिडितेला लग्नाचेसुद्धा आमिष दिले,पिडितेचे कुटुंब घरी नसल्याचे पाहुन आरोपीने तिचेवर अनेकदा बळजबरी केली परंतु हे सर्व असह्य झाल्याने अखेर पीडितेने आरोपीशी संबंधविच्छेद केला,यावर चिडून जाऊन आरोपीने पीडितेच्या आईलासुद्धा भ्रमणध्वनीवरुन शिविगाळ केली.
पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला, पीडितेने घटनेची तक्रार काल दि.२ रोजी हिंगणघाट पोलिसांत दाखल केल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपिचा शोध घेत त्याला जेरबंद केले. सदर प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पपीन रामटेके,डीबी पथकाचे पोहवा शेखर डोंगरे,नापोशी निलेश तेलरान्धे,सचिन घेवन्दे,विशाल बंगाले,पोशी सचिन भारशंकर तसेच डीबी पथकाचे विवेक बंसोड़ यांनी कारवाई केली.

Leave a Reply