वऱ्हाडी ठेचा …अनिल शेंडे

सिंहाचे शेळीकरण !

ही लुटीयन हाडुकजीवी पत्रकारांची
आणि लेखकुंची जमात
जादुगारापेक्षा कमी नाही !
शेळीचा वाघ बनविणे आणि सिंहाला शेळी सिद्ध करणे या कलेत यांना तोड नाही !
कितीतरी क्रूरकर्म्यांना महान सेनानी
आणि भोंदुंना संत करण्याची किमया
यांनी अनेकदा केली आहे !
एखाद्या राष्ट्रपुरुषाला इतिहासातून
बेदखल करणे , आणि ,
अगदीच किरकोळांना आणि दुरात्म्यांनाही राष्ट्रपुरुष सिद्ध करणे
यांच्या डाव्या हातचा मळ आहे !
पण, यांचे हे वर्षानुवर्षांचे चाळे
लोक आता समजून चुकले आहेत
अरे टकल्याटुकल्या वराहांनो , तुम्ही
खूप झाकण्याचा प्रयत्न केला, तरी, तो सूर्य आता उगवला आहे !
आणि त्याच्या तेजाने तो सम्पूर्ण विश्वाला दिपवणारच आहे !
तुम्ही मात्र त्याच्या तेजाने तुमचे डोळे
निकामी होण्याआधी
राष्ट्रभक्तीचं अंजन तुमच्या डोळ्यात
घालून घ्या
नाहीतर तुमचा कपाळमोक्ष अटळ आहे !

कवी — अनिल शेंडे

Leave a Reply