नवी दिल्ली : २ जून – अदानी समूहाने विमानतळांच्या खासगीकरण मोहिमेअंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सहा विमानतळं ताब्यात घेतली आहे. या विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्यात आलेलं आहे. मात्र यापैकी लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भाड्यामध्ये कंपनीने १० पटींने वाढ केलीय. कंपनीने विमानतळाकडून घेण्यात येणाऱ्या टर्नअराउण्ड चार्जेसमध्ये मोठी वाढ केल्याने याचा फटका खासगी तसेच आंतरराष्ट्रीय विमानांना बसणार आहे.
गरी हवाई सेवाक्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अदानी समूह लवकरच त्यांच्या ताब्यातील इतर पाच विमानतळांवरील भाड्याचे दरही वाढवण्याची चिन्हं आहेत. यामध्ये जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. २०१९ साली या विमातळांच्या देखभाल आणि हताळणीचे कंत्राटं ५० वर्षांसाठी अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यात करार झाला होता.
सामान्यपणे देशामधील जवळजवळ सर्वच विमानतळांवर आकारण्यात येणारं शुल्क किती असावं याचा निर्णय सरकार किंवा एअरपोर्ट इकनॉमिक रेग्युलेट्री अथॉरिटी (एईआरए) घेते. मात्र काही ठराविक काळासाठी देखभाल करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या ताब्यातील विमानतळांवरील शुल्क ठरवण्याची मूभा देण्यात आलीय. एईआरए आणि नियंत्रकांकडून विमानतळ शुल्क हे पाच वर्षांसाठी निश्चित केलं जात. लखनऊ विमानतळासंदर्भातील पाच वर्षांचा करार मागील वर्षी संपुष्टात आला. त्यानंतर पुढील पाच वर्षासंदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता. मागील वर्षाच अदानी समुहाने या विमानतळाचा ताबा घेतला.
अदानी समुहाने लखनऊ विमानतळावरील कारभार पाहण्यासाठी नवीन कंपनीची नियुक्ती केल्याने दर वाढवण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दर वाढवण्यात आले असले तरी सेवांमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. “अचानक हे दर वाढवताना सेवांमध्ये काही विशेष बदल केल्याचं दिसून येत नाहीय. तसेच लखनऊ विमानतळावरील बिझनेस जेट विमानं लखनऊमध्ये वैद्यकीय मदतासाठी येतात,” असं विमान कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. या दरवाढीसंदर्भात पाठवण्यात आलेल्या ईमेलला अदानी समुहाकडून उत्तर आलेले नाही.
विमानतळाच्या खासगी करणामुळे येथील कारभार आणि कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होईल असं सांगण्यात आलं. मात्र त्याचवेळी कारभार हाताळणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणाऱ्या दरवाढीच्या स्वातंत्र्याला विमान कंपन्यांचा विशेष आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन अॅण्ड फेड्रेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि हैदराबाद विमानतळांवरील दरांबद्दल यापूर्वीच नाराजी व्यक्त केलीय.