वाघाच्या हल्ल्यात सरपण गोळा करण्यासाठी गेलेली महिला ठार

चंद्रपूर : १ जून – सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 527 मध्ये आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. वैशाली विलास मांदाडे असे मृतक महिलेचे नाव असून, ती सुशी दाबगाव येथील रहिवासी आहे.
वनविकास महामंडळाच्या जंगलात गावातील काही महिला सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सरपण गोळा करीत असताना तिकडे दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेऊन मृतक महिलेवर हल्ला केला. त्यात जी जागीच मृत्यूमुखी पडली. घटनास्थळी ग्रामस्थ व वनविभागाच्या अधिकार्यांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply