देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : १ जून – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना एका शेतकऱ्याने कीटकनाशक औषधी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. अचानक योगेश पाटील नावाचा शेतकरी अचानकपणे फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आला.
हातात कीटकनाशक औषधी घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण वेळीच पोलिसांनी झडप घालून त्यांच्या हातातील कीटनाशकाचा डबा जप्त केला. योगेश पाटील यांची केळीची बाग आहे. या बागेचं अतोनात नुकसान झालं आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पाहणी दौरा हा फक्त फोटो सेशनसाठी आहे. देवेंद्र फडणवीस हे फक्त रस्त्यावरील असलेल्या शेताचीच पाहणी करत आहे, असा आरोप करत योगेश पाटील यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, त्याआधीही खासदार रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले असता परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा ताफा अडवला.
चंद्रकांत पाटील यांचा आठ महिन्याचा कार्यकाळ होता. त्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. स्वत: भावी मुख्यमंत्री म्हणून घेता पण त्यांनीही काहीच काम केले. मुक्ताईनगरच्या जिल्हा हॉस्पिटलचेही काहीच काम केले नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तसंच, एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपचे आमदार असताना सुद्धा कुठली विकास कामे केले नसल्याचा आरोप ही केला.
मुक्ताईनगरमध्ये त्यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे.

Leave a Reply