घरभाडे वसूल करण्यासाठी भाच्याने केला दिव्यांग मामावर अँसिड हल्ला

नागपूर : १ जून – कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन असल्याने अनेकांना आपल्या घराचं किंवा दुकाचं भाडंही देता येत नाही. अशात बेरोजगार दिव्यांग लोकांची परिस्थिती तर आणखीच बिकट बनली आहे. त्यांचा उदरनिर्हावाचा प्रश्न निर्माण झाला असताना घरभाडं देणं कठिण होऊन बसलं आहे.
अशातच घरभाडे न दिल्याने भाडेकरू व्यक्तीवर अँसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घटली आहे. विशेष म्हणजे, भाडेकरू व्यक्ती हा आरोपीचा मामा असून ते दिव्यांग आहेत. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेली. हाताला दुसरा कोणताही रोजगारही नाही. यामुळे दिव्यांग मामाने मागील तीन महिन्यापासून घराचं भाडं दिलं नव्हतं. पण घरमालक भाचा वारंवार पैशासाठी तगादा लावत होता. यातूनच रागाच्या भरात आरोपीने भाडेकरू मामावर अँसिड हल्ला केला आहे. या हल्ल्यात मामा गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
संबंधित घटना नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तर अँसिड हल्ला झालेल्या भाडेकरू मामाचं नाव डोमाजी गौरकार असून ते दिव्यांग आहेत. अशात मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचं मागील तीन महिन्यांपासून घराचं भाडं थकीत होतं. नात्याने भाचा लागणारा घरमालक पैशासाठी भाडेकरूकडे वारंवार तगादा लावला होता.
मात्र डोमजी गौरकार पैसे देऊ शकले नाही. त्यामुळे दोघांतील वाद वाढत गेला. यातूनच आरोपी भाच्याने रागाच्या भरात हे कृत्य केलं आहे. या अँसिड हल्ल्यात डोमाजी गौरकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी आरोपी सुदाम खोत याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Leave a Reply