इंटक’ पदाधिकारी त्रिशरण सहारेला अटक

नागपूर : १ जून – राजघराण्यातील सदस्याला पत्रकाराच्या नावाने बदनामीची धमकी देऊन दोन लाख रुपयांची खंडणी मागणारा इंटकचापदाधिकारी व विदर्भ वैद्यकीय महाविद्याल व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचा कार्यकारी अध्यक्ष त्रिशरण ऊर्फ बंडू शंकरराव सहारे (५०), रा. सदोदय पॅलेस, कामठी रोड, गड्डीगोदाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
कुख्यात रणजित सफेलकर याला काही दिवसांपूर्वी गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्याच्या बँक व्यवहाराचीही झाडाझडती घेतली.
चार वर्षांंपूर्वी उमरेडजवळील टेमसना गावाजवळील १५ एकर शेतीचा व्यवहाराची काही रक्कम सफेलकरच्या  बँक खात्यातून राजघराण्यातील सदस्याच्या बँक खात्यात वळती झाल्याचे समोर आले.
गुन्हेशाखा पोलिसांनी सदस्याची चौकशी केली.
दरम्यान, याबाबत सहारे यांना माहिती मिळाली.
सहारे यांनी राजघरण्याच्या सदस्याशी संपर्क साधला.
पत्रकारांकडे कुख्यात गुंड रणजित सफेलकर याच्यासोबतचे तुमचे छायाचित्र आहे.
‘पत्रकारांना सेट केले नाही तर तुमचे  व सफेलकरचे छायाचित्र ते प्रकाशित करतील.
तुमची बदनामी होईल’, अशी भीती दाखवली.
वृत्त प्रकाशित न करण्यासाठी दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
सदस्यांने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली.
अमितेशकुमार यांनी गुन्हेशाखा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.

Leave a Reply