मनाच्या हिंदोळ्यावर

आत्मिश्वास


कदाचित तुम्हाला माहिती असावं, आपल्या अंतर्मनात एक अद्भुत शक्ती वास करते. ती म्हणजे आपला स्वतःचा आत्मविश्वास. ‘मी हे काम करेल किंवा मला हे जमेलच’ हा जो मनातून येणारा आवाज असतो तो आपल्या अंतर्मनातला आत्मविश्वास.
एखादं काम घडण्याआधीच किंवा एखादा निकाल लग्ण्यआधीच रचून ठेवलेले सकारात्मक आपले मत, म्हणजेच आपला आत्मविश्वास.
रोजच्या जीवनातले उदाहरण पहा, आपण घरात एखादी सकारात्मक भूमिका किंवा मनात सकारात्मक आव्हान बोलतो तेव्हा नकळतपणे घरातली वास्तू ही तथास्तु म्हणते आणि ते काम सहजरीत्या होतं. तसच नकारात्मक जेव्हा बोलतो तेव्हा वाईट गोष्टी घडू लागतात. म्हणूनच आपण नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. ‘मी हे काम खूप चांगल्या प्रकारे करु शकते’ या विश्वासामुळेच आपण केलेले प्रयत्न सफल होतात. आपल्या प्रयत्नांना यशाचे रुप मिळते ते केवळ आपल्या आत्मविश्वासामुळेच.
पण कधीकधी प्रत्येक गोष्टीला एक limit असते गोष्टी या limit च्या बाहेर गेल्या की तो होतो overconfidence ज्याला म्हणता येईल मर्यादेपलीकडे गेलेला आत्मविश्वास.
माणसाला देवाने एक मोठे सामर्थ्य दिले आहे ते म्हणजे विचार. ही खूप मोठी माणसाची शक्ती आहे आणि ह्या शक्तीला पाठबळ मिळालं ते माणसाच्या भक्तीने. भक्ती हे माणसाच्या श्रद्धेचे रूप आहे आणि या भक्तीत जेव्हा संशय नावाचे विष जन्म घेतं तेव्हा ही शक्ती पूर्णतः नष्ट होते, म्हणजेच जेव्हा आपण स्वतःवर संशय घेऊन एखादे काम हाती घेतो की मी हे काम करू शकेन की नाही तेव्हा मात्र त्यातली ऊर्जा त्यातली शक्तीही down व्हायला सुरुवात होते आणि result काय मिळतो तो नकारात्मक. आपला स्वतःवर जेव्हा संशय येतो तेव्हाच नकळतपणे दुसऱ्यांवर संशय घेण्याची प्रवृत्ती ही त्या माणसात जन्म घेते आणि या संशयरुपी विचारांच्या स्पंदनांना नशिबाकडूनच तथास्तु प्राप्त होत.
आपल्या सुखी संसारात सुद्धा बघा ना जसा समजूतदारपणा महत्त्वाचा आहे, तडजोड महत्त्वाची आहे,तितकाच महत्त्वाचा आहे एकमेकांवरचा विश्वास. या विश्वासानेच नाते टिकवता येते संशय आला तर ते नाते कधीच टिकू शकत नाही.
आपल्यातला आत्मविश्वासामुळे व समोरच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे ते नाते आयुष्यभर टिकून राहते. हा आत्मविश्वास जर टिकून राहायचं असेल तर आपण जी भक्ती, ध्यान करतो त्यानेच हा आत्मविश्वास वाढावयास आपसूकच मदत होते.
जर आपल्या मनात संशयरुपी वादळ निर्माण झाले तर ते फक्त आपल्या ध्यान ,आपल्या भक्ती मुळेच शमऊ शकेल यात काही वाद नाही. म्हणूनच आत्मविश्वासा ध्यान ही तितकीच महत्वाची आहे.

पल्लवी उधोजी

Leave a Reply