प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर सुरू करणार – सुनील केदार

नागपूर : ३१ मे – राज्यात एकाच वेळी सर्वच जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर सुरू करण्यात येणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यासाठी केंद्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेटून केदार यांनी राज्यातील क्रीडा धोरण व आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाबाबत चर्चा केली होती.
देशभरात क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्यशासनाच्या सहकार्याने क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया सेंटर सुरू करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक खेलो इंडिया सेंटर सुरू होणार आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 हजार नवीन सेंटर असणार आहे.

राज्यात 36 जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून 3 कोटी 60 लक्ष इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने एकमेकांच्या सहकार्याने राज्यातील व देशातील तळागाळातील खेळाडूंना उत्तमोत्तम पायाभुत सुविधा उपलब्ध होण्यासाठी हे सेंटर उभारण्यात येणार आहे. त्या व्दारेच लहान वयातील प्रतिभावान खेळाडूंना या योजनेतून चांगले प्रशिक्षक आणि उपकरणांच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये दर्जेदार कामगिरी करण्यासाठी ही केंद्रे सहाय्यभूत ठरणार आहेत. राज्यात जास्तीत जास्त खेलो इंडिया अंतर्गत अधिक सेंटर सुरू करून खेळाडूंना प्रशिक्षणाची सुविधा करून देण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

Leave a Reply