वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

कुपमंडुकांची मांदियाळी !

“विद्या विनयेन शोभते ” ही म्हण
केवळ सर्वसामान्य लोकांनाच नव्हे
तर, मोठेमोठे विद्वान डॉक्टर्स आणि
योगगुरूंनाही तितकीच लागू पडते !

या जगात कोणीही परिपूर्ण नाही
सगळ्यांचे एकदुसर्यावाचून अडते !

एक कवी म्हणतो —
” ज्ञाताहुनही अज्ञाताचे सागर असती खोल !
नकोस बडवू उगाच आपुल्या पांडित्याचे ढोल ! “

मग कशाला कुपमंडुक वृत्तीने आपल्याच उपचारपद्धतीचा डिंडीम वाजवावा !
आणि इतरांना तुच्छ लेखावे !

बरं अलोपॅथीमधे अशी किती औषधे आहेत , ज्यांचे काहीही दुष्परिणाम नाहीत ?

म्हणूनच टोकाची भांडणे करण्यापेक्षा
एक दुसऱ्याशी सहकार्य करण्यात ,
समन्वय करण्यात मानवतेचे भले आहे ,
एकापेक्षा एक महाधुरंधर विद्वानांना
हे सांगायची वेळ येणे , हीच खरी शोकांतिका आहे !

    कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply