क्वारंटाईन सेंटरच्या शौचालयाची सफाई चिमुकल्याकडून करून घेतली – व्हिडीओ व्हायरल

बुलडाणा : ३० मे – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाने गावागावात शाळा खोल्यात क्वारंटाइन सेंटर उभारले आहे. पण, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एका क्वारंटाइन सेंटरच्या शौचालयाची सफाई चक्क एका ८ ते १० वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्याकडून करून घेतली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घडली असल्याने पंचायत समिती प्रशासन कडून गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील कोरोनाच्या संशयित रुग्ण व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. संग्रामपूर तालुक्यात बुलढाणा जिल्हाधिकारी रामामूर्ती यांनी तालुक्यातील गावात भेटी देऊन आढावा घेण्याचा दौरा असल्याने तालुक्यातील पंचायत समितीचे प्रशासन कामाला लागले. ज्या गावात विलीगिकरण आहे त्या त्या गावा गावात गटविकास अधिकारी यांनी क्वारंटाइन सेंटरची साफ सफाई व करण्याचे आदेश दिले.
गाव पातळीवर असलेले ग्रामपंचायत सचिव, सरपंच ,कर्मचारी प्रशासन यांनी घाई गडबडीत साफ सफाई केली. मात्र तालुक्यातील मारोड येथील प्राथमिक शाळा या विलगीकरण कक्षात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्राम पंचायत पातळीवर विलीगिकरणामधील शौचालय चक्क एका 8 वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्याकडून साफ करून घेण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यामध्ये चक्क चिमुकला संडास साफ करून राहिला व त्याला स्थानिक ग्राम पंचायत कर्मचारी सांगत आहे. या घटनेबाबत गटविकास अधिकारी संजय पाटील पूर्ण माहिती असून देखील संबंधित घटनेबद्दल विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले.
आज भारत देश स्वतंत्र झाला तरी देखील ग्रामीण भागात अशा महाशय अधिकारी या गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.

Leave a Reply