विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराचा केला प्रयत्न, आरोपी अटकेत

नागपूर : २९ मे – विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
चेतन नरेश काकडे (२१), रा. राजीवनगर असे आरोपीचे नाव आहे. तो ऑटोचालक आहे. पीडित १६ वर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिकते. करोनामुळे शाळा बंद आहे. पण, शाळेचे शुल्क भरण्यासाठी ती ११ वाजता घरून निघाली व ऑटोने हिंगणा मार्गावरील एका बँकेत गेली. तेथून ती शाळेत गेली. ती बाहेर निघाली असता आरोपी उभा होता. येतानाही तोच होता व जाण्यासाठी त्याने पीडितेला बसायला सांगितले. तेव्हा ऑटोत तिच्याशिवाय दुसरा प्रवासी नव्हता. त्यामुळे आरोपीने इतर प्रवासी शोधण्यासाठी समोर जाण्यासाठी तिला विचारले. त्याने हिंगणा येथील चौकापर्यंत नेले. तेथेही प्रवासी भेटले नाही. त्यानंतर आरोपीचा हेतू वेगळाच होता. तो आऊटर रिंगरोडच्या दिशेने ऑटो घेऊन जात होता. पीडित मुलगी त्याला उरतण्यासाठी विनंती करीत होती. तेव्हा त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देऊन आरडाओरड केली. त्याने घाबरून ऑटो थांबवला असता ती उतरली व रस्त्याने येणाऱ्या एका व्यक्तीला मदत मागितली. त्या व्यक्तीने तिला पोलीस ठाण्यापर्यंत सोडले. पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

Leave a Reply