वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे

आजचे कर्ण !

आज माझं हृदय राहुन राहुन
आनंदाने अक्षरशः उचंबळून येत आहे !
हे पाहून की या भयंकर महामारीच्या
काळातही
काही महापुरुषांचा सेवाभाव
उसळून उसळून वर येत आहे !

एका मुख्यमंत्र्यांनी कोरोनाने गेलेल्यांना फुकट कफन पुरवण्याचं
कबूल केलं आहे !
तर दुसरे मुख्यमंत्री मृतांच्या शवांसाठी फुकट लाकडं पुरवणार आहेत !
आणि तिसरे ,शवांना घाटावर नेण्याची व्यवस्था करणार आहेत !

अहाहा ! काय ही उदारता !
केवढा हा मनाचा मोठेपणा !
हे हरिश्चंद्रा, हे कर्णा ,हे सर्व ऐकून
तुमची छातीही अभिमानाने
फुगून गेली असेल नाही का ?

पण काही नतद्रष्ट वेडे याला हसतात
त्यांना बिचार्यांना काय माहीत, की,
कफन आणि लाकडं किती महाग असतात !

  कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply