नागपूर : २९ मे – नागपुरातील लष्करीबाग शीतला माता मंदिर परिसरात निर्घृण हत्येचा प्रकार घडला आहे. शहरातील लष्करीबाग परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आली आहे. कपिन बेन (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार, कपिल बेन या परिसरात उभा असताना उमेश चिकाटे,कालू आणि भुरू यांच्याशी खर्रा खाताना त्याचा वाद झाला. त्यांच्या वाद विकोला गेला. आणि उमेश,कालू आणि भूरू यांनी वादातून कपिलची माराहण करत खाली पाडले. आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली. याप्रकरणात सहभागी तिन्ही आरोपी पसार झाले आहेत. या हत्या प्रकरणानंतर लष्करीबाग परिसरात खळबळ उडाली आहे. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले हत्यासत्रामुळे नागरिकांत दहशत आणि संताप आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलण्याची मागणी होत आहे. आरोपींच्या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली असुन त्यांना अटक करण्यासाठी पाचपावली पोलीस ठाण्याचे डीबी पथक रवाना करण्यात आले आहे.