सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

बाप्तिस्मा ३

१९९७-९८ कामाचे निमित्ताने दोन वर्षे शेवगाव-पाथर्डी-अमरापुरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाण्याच्या टाक्या, पाईप लाईन ह्याची कामं होती.
औरंगाबाद हुन साधारण दोन तासाचा रस्ता.
इथली माणसं थोडासा हेल काढून बोलतात. ऐकताना गोड वाटतं. अगदी भांडण जरी करीत असतील तर व-हाडी माणसाला वाटुच् नये की भांडण चालू आहे. पण ही माणसं तिखट खाणार ते आपल्याला एकदम पराकोटीचं वाटते. शेवगावला बस स्टेशनवर तर्री पोहा मिळायचा – तर्री तीन प्रकारची साधी-मिडियम-तेज.
आपण नागपूरकरांना वाटते की आपण सावजी खातो म्हणजे जगातील कुठलेही तेज आपण खाऊ शकतो. पण ह्या वृथा अभिमानाचा पार चोथा केला ह्या तर्री पोह्याने. एक दिवस रविवारचे सकाळी आम्ही सगळे खास नाश्ता करायचा म्हणून बस स्टॅण्ड ला आलो. बढिया चौघांनी चार तर्री पोहा तेज ची आॅर्डर दिली. मस्तपैकी गरमागरम तर्री पोहा दोन मिनिटात टेबलवर. आम्ही एक घास तोंडात टाकला अन् बापरे बाप… तोंडात जाळ… डोळ्यातून पाणी…… कानातून वाफा…..सगळ्या अवयवांच्या कृती पहिल्याच घासात….सर्व गात्र शिथिल……सगळ्यांचा तेज खा सकते हा माज क्षणार्धात उतरला….. सिर्फ सावजी ही नहीं और भी “तेज” है इस जहाँ में….असो सगळ्यांनी आपली साधी तर्री पोहा खाल्ला आणि आम्हाला शेवगाव ह्या गावाचा अंदाज आला.
शेवगाव पाथर्डी साधारण २० कि.मी. तर शेवगाव – अमरापूर १० कि.मी.
पाथर्डी ला कानिफ नाथांची समाधी आहे. रविवारी आंघोळ न्याहरी झाली की मस्त पैकी कार काढायची आणि कानिफनाथांचे समाधी स्थानी जायचे. कानिफनाथांची समाधीसाठी दगडी जिन्याने बरेच खाली उतरावे लागते आणि खाली तळघरात एक छोटीशी खोली आहे अंधारी, तिथे समाधीस्थानी पिंड आहे. तिथे मस्त डोळे मिटून बसले की तासभर कसा निघून जातो कळत नाही. हा मात्र माझा दर रविवार चा उपक्रम. इथुनंच् दुरवर एक टेकडी दिसते तिथे टेकडीवर गोरक्षनाथांची समाधी आहे. असे म्हणतात त्या समाधीस्थळी त्यावेळेस पासून मुसलमानांनी कब्जा केला आहे आणि ते गोरक्षनाथांना हा आमचा “पीर” आहे असे संबोधत. कानिफनाथांचे मंदिराचे परिसरात फुलं, पुजा साहित्य विक्रेते सगळे मुसलमान होते आणि गैर मुस्लिम लोकांना त्यांनी तिथून हुसकावून लावले होते.आणि हे मंदिर सुद्धा हडपायच्या प्रयत्नात, स्थानिक मुसलमान होते. त्यांच्या मते नऊ पीर सध्या, हिंदू लोकांनी आपल्या कब्जात घेऊन हिंदू नावे ठेवली आहेत आणि त्यांना हस्तगत करण्यासाठी येन केन प्रकारेण ताब्यात घ्यायचे प्रयत्न सुरू होते. मात्र कानिफनाथांचे देवस्थान वाचविण्यासाठी कुठलेही प्रयत्न हिंदू संघटनांनी केल्याचे ऐकिवात नाही. सध्या दोन्ही देवस्थानांची परिस्थिती काय? माहिती नाही.
त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री होता आणि गावागावात पाणी पोचवण्यासाठी ब-याच पाणी पुरवठ्याच्या स्किम्स आल्या होत्या. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुढाकाराने गावागावात पाणी पोचवण्याच्या योजना कार्यान्वित होत्या.
एकदा शनिवारी अमरापुरचे काम आटोपता आटोपता संध्याकाळ झाली आणि रस्त्यावर जाताना बघतो तर रिक्षात चर्च चा बिशप स्थानापन्न, रिक्षा जवळजवळ पायी चालवत होता रिक्षेवाला, समोर २०-२५ तरूण मुलांचा घोळका, हातात टाळ, ढोलकी घेऊन भजन म्हणत चाललेले. सगळी भजनं म्हणजे नामदेव, चोखा ह्यांचे अभंग किंवा भजनं फक्त जिथे नामदेव किंवा चोखोबा चे नाव येईल तिथे हे “येशू” च नाव टाकत आणि भजनं म्हणत होते. खरं म्हणजे मला चीड आली. खेड्यापाड्यातील लोकांना फुस लावुन त्यांचा बाप्तिस्मा करून, ही भजनं येशू ची आहे असे त्यांना सांगण्यात आले होते. आणि भोळे भाबडे खेड्यापाड्यातील गावकरी सुद्धा त्यांना प्रतिसाद पर दुजोरा देतात. खरं म्हणजे खेड्यापाड्यातील हिंदू गावक-यांना सांभाळून घ्यायची जबाबदारी प्रत्येक राज्य सरकारने घ्यायला हवी. त्यांना खेड्यापाड्यात पडीत न ठेवता, रस्ते सर्व खेडोपाडी पोचवले पाहिजे, जेणेकरून खेड्यापाड्यातील हिंदू शहरांशी जोडले जातील आणि तात्पर्य हे की त्यांची “हिंदू नाळ” अधिकाधिक घट्ट होत जाईल. काही मदत लागल्यास त्यांना लगेच मदत मिळु शकते. कारण स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की दुस-या धर्मात गेलेला हिंदू – हा हिंदू धर्माचा जन्मभर कट्टर शत्रू बनून कायम स्वरुपी शत्रू राहतो.

मी सोमवारी कामगारांची यादी बघितली. तर जॉर्ज गायकवाड, पिटर जाधव सगळे अशी नावे, म्हणजे सगळे कामगार बाप्तिस्मा धारी…विश्वासात घेऊन विचारले तर त्यांनी सांगितले आम्हाला मुद्दाम अशी नावे दिली आहेत. आम्ही मराठी भाषिक, कोणी मराठी माणूस भेटला की आम्ही त्यांना आडनाव सांगतो, गायकवाड, जाधव. म्हणजे आम्हाला मराठी माणसांत मिसळता ही येते आणि गळाला लागला एखाद्या ला फोडता ही येते आणि असे ख्रिश्चन बनवण्यासाठी कोणाला आणले आणि तो ख्रिश्चन झाला तर आम्हाला पैसा पण मिळतो……….
पैसा????????? हो पैसा पण धर्मांतरण करवून घेण्याचे सगळ्यात मोठे शस्त्र आहे.
अमेरिका International Mission Board (IMB) ने फक्त भारतात धर्मांतरासाठी १२.७७ लाख करोड रुपये दिले आहेत. २०२१ साठी. बाप हो…… आकडा परत बघा …. किती…..१२.७७ लाख करोड (१२,७७,४८९ करोड रुपये) मुळ मुद्दा हिंदू लोकांचे धर्मांतरण हा आहे तर त्या खालोखाल बुद्ध, जैन, सिख आणि मुसलमानांना प्राधान्य दिले आहे. पण भारतात संख्येनी हिंदू जास्त असल्याने, सर्वात जास्त प्राधान्य हिंदू लोकांना धर्मांतरीत करण्याचे लक्ष्य आहे.ह्या मिशनरी ने आपल्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध करून दिली आहे की ते धर्मांतरीत हिंदू लोकांचा उपयोग , हिंदू लोकांना धर्मांतरीत करण्यासाठी करणार आणि फक्त भारतात ३५३५ कुटुंब ह्या कामात फक्त भारतासाठी कार्यान्वित आहेत.
ह्यांचे मुख्यत्वे लक्ष्य हे कॉलेजमध्ये जाणारे तरूण युवक – तरुणी आहेत. खेड्यापाड्यातील गरीब लोक, स्लम वस्तीतील गरीब तबका आहे, हे सुद्धा ह्यांच्या यादीत धर्मांतरासाठी समाविष्ट आहेत.
ह्या IMB चे नकाशामध्ये, मुद्दाम चिथावणीखोर पणा करायला नकाशामध्ये, जम्मू काश्मीर भारतापासून विलग दाखवतात आणि लद्दाख ला चीन मध्ये सामील दाखवतात. अतिशय मोठे षडयंत्र हिंदू विरोधी आणि भारतविरोधी आहेत. https://www.imb.org/trips ला भेट द्या तर हिंदू तरूण तरुणींसाठी पण पर्यटनासाठी मोफत संधी, जेणेकरून त्यांचा व्यवस्थितपणे ब्रेन वॉशिंग करून सरळ सरळ बाप्तिस्मा करून परत आणले जाईल.
कुठवर आपण सहन करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण असहाय आणि गरिबांच्या गोटात शिरुन बाप्तिस्मा करणे हे फार पूर्वीपासून चालत आलेले आहे.
ह्याला आपण हिंदू म्हणून शह देवु शकत नाही का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारोच्या संख्येने परधर्मात गेलेल्या हिंदुंना स्वधर्मात आणले होते. संत श्री पाचलेगावकर महाराजांनी लाखो परधर्मियातील हिंदू ना हिंदू बनवले, याचा उल्लेख आहे. आताशा आपण घरवापसी म्हणतो ही घरवापसी थंडावली आहे, पण आपल्या कडून स्वधर्मात आणण्याचा वेग वाढवणे आवश्यक आहे. आणि ह्याउपर होत असणारे फंडिंग रोखणे अतिशय गरजेचे आहे.
जे कामं ख्रिश्चन मिशनरी करतात – गावा गावात दवाखाने, अगदी खेडोपाडी, अतिउंच टेकड्यावरील वस्तीत सुद्धा असे दवाखाने उघडुन त्यामार्फत जर जन जागृती अभियान सुरू केले तर हा एक ख्रिश्चन मिशनरी ना शह होवु शकतो असे वाटते. सर्व हिंदू लोकांना एकत्रित करून, त्यांना हिंदू धर्माची सत्यता महती पटवून त्यांच्यात एक कायमस्वरूपी हिंदू तत्वांनी प्रेरित, हिंदू समाजाचा निर्माण करणे गरजेचे आहे की जे हिंदू बाप्तिस्मा करायला आलेल्या धर्मांतरीत हिंदू ची घरवापसी करण्याच्या ताकदीची असतील. तरंच् आपण हिंदू धर्मांतरण थांबवु शकतो आणि घरवापसी साठी प्रेरित करु शकतो. ह्यासाठी प्रत्येक राज्याची इच्छाशक्ती सुद्धा आवश्यक आहे. आणि आम्ही तिथे मार खातो.
घर का भेदी लंका ढाए…. म्हणीप्रमाणे आमच्या घरात सगळे घरभेदी बसले आहेत. असे पुष्कळ आमचे नेतागण धर्मांतरीत आहे आणि हिंदू नावं वापरून सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे.
सगळ्यात ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेनेने तर नुसता विश्वासघात केला नाही तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू शिवसेना – छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदवी स्वराज्य असणा-या हिंदुत्ववादी तत्वांचा बाप्तिस्मा करीत हिरवे झगे चढवले आणि लांड्या पायजाम्याच्या नाड्या आवळंत, मराठा आरक्षणाच्या ठिक-या उडवल्या आणि मुसलमान आरक्षणासाठी पाच टक्के. आपण ओळखणार तरी कसे? कौन अपना और कौन पराया????
घड्याळ वादी पार्टी चा मालक तर सरळ सांगतो की १९९२-९३ बॉंबस्फोट एक जास्तीचा मुस्लिम बहुल इलाक्यात झाला असे खोटे सांगावे लागले. अरे! किती हा मुस्लिम धार्जिणे पणा????
ह्या साहेबांनी तर त्यावेळेस मुस्लीम तस्कराला मुंबई आंदण द्यायचा घाट घातला होता. मला हो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे का… ज्यांनी हा घाट उधळुन लावला…..वरना मियां आज आप उर्दू बोल रिये होते….. सर पर सबके गोल टोपी होती…….और चार बेगम बुर्के मे होती……. हिंदू धरम का क्या होता पता नहीं, मगर हर एक की औलादे चालिस होती……….. बसं बाळासाहेब आज तुमची नितांत गरज भासते…… आता ती शिवसेना नाही राहिली……ही शिवसेना हिंदू रक्षण नाही करू शकत……. छत्रपती शिवाजी महाराज आज बाजारात मतांसाठी वापरणारी शिवसेना झाली आहे आणि असे कितीतरी छुप्या संघटना NGO मार्फत पैसा आणुन हिंदू धर्माचा बाप्तिस्मा करण्यासाठी वापरतात. मोदींनी जेव्हा ह्या NGO वर बंदी आणली तेव्हा सगळे बाप्तिस्मा पटु संघटना आणि मुसलमान संघटना आपापल्या शेपटावर पाय पडल्यागत किंचाळत उभ्या ठाकल्या होत्या.
दिल्ली चा “खासीपती” ह्याची फाईल उघडुन पहा, असे म्हणतात हा पण बाप्तिस्मा धारी आहे आणि हिंदू नावाने वावरतो आहे. गाईच्या खाटकाचा कारखाना असलेला कॉंग्रेसी नेता हा देखील ख्रिश्चन पण हिंदू नावाखाली हिंदू म्हणून वावरतो आहे. सरकारने अशा लोकांची यादी जाहीर करावी जातीसकट जेणेकरून , लोकांमध्ये पारदर्शिता राहील आणि गफलतीत नाही राहणार, सामान्य जनता.
पण कसे ही करून हे सर्व धर्मांतराचे प्रस्थ रोखणे हे खुप मोठे चॅलेंज आहे, एवढे निश्चित. केंद्र सरकारने ह्यामध्ये सर्व हक्क स्व स्वाधीन करून त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
“ममता बॅनर्जी” परत ही बाई हिंदू नावाखाली सर्रास हिंदुंच्या कत्तली घडवून आणते आणि मुस्लिम अजेंडा चालवते. हे आता आता आपल्या लक्षात आले पण सुरुवातीच्या काळात जम बसेपर्यंत , आमचे हिंदू बांधव मुर्ख बनले हिला आपले मत देवुन. वेळीच लक्षात आले असते, नावाचा दुरुपयोग न करता “ममता बानो” हे खरे नाव जर समोर आले असते तर पश्चिम बंगाल इतका प्रचंड हिंदू विरोधी तडाख्यात आलाच् नसता. आज पश्चिम बंगाल मधले हिंदू अतिशय भयप्रद वातावरणात जगत आहेत आणि राज्यपालांचा एक व्हिडिओ व्हायरल पण होत आहे की जिथे स्त्री विचारते आहे की बंगालमध्ये जगायचं तर मुस्लिम धर्म स्विकारावा लागेल का???? आणि अंतर्मुख राज्यपाल शब्दहीन गुपचूप तिच्यासमोर उभे आहेत. ज्या बाईने राज्यपालाची कदर नाही ठेवली! तुमची आमची काय बिशाद????
राज्य सरकारे ह्याच्यावर अशाप्रकारचे खालच्या प्रतीचे राजकारण करीत पोळ्या शेकण्यापेक्षा, केंद्र सरकारने तातडीने, अधिक उपाययोजना करीत कायम स्वरुपी निर्बंध घालून हिंदू जनसंख्या वाढवून भारताला जगातील एकमेव “हिंदू राष्ट्र” घोषित करणे गरजेचे आहे.

भाई देवघरे

Leave a Reply