सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

इंटरनेटवरून शेळ्या हाकणारा घरकोंबडा

WHO ला सल्ला देणारे अगाध अज्ञानी महाराष्ट्र कसा सांभाळू शकतील?
आपला महाराष्ट्र – आपले ज्ञान
आपले ज्ञान – कोरोनाग्रस्त ज्ञान
कंपाउंडरच्या मते साहेबांना कोरोनाचे इतके प्रचंड ज्ञान आहे की साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राला कोरोना ज्ञानाने ग्रस्त करून ठेवले.
म्हणजे कोरोनाने ग्रस्त रंजली गांजली रयत, दुस-या कोरोना लाटेशी झुंजत आहे.
तर आमचे राज्य सरकार मात्र एकदम पारदर्शी आहे. मला महाराष्ट्र सरकारचे खरं म्हणजे कौतुक वाटते. एखाद्या सरकारचं जर व्हीजन – विचारलं तर कसं असावं? तर ते महाराष्ट्र सरकार सारखं असावं. काय करायचं – ह्याची कितीतरी अगोदर पासून तयारी?? सध्याच्या दुस-या लाटेचे काय? तर – कंपाउंडर, साहेब, भतीजा सगळे एकजात कोकलणार – ही तर केंद्र सरकारची जबाबदारी!!!!
मग साहेब लगेच दुस-या लाटेवर भाषण देणार…. आमचे पुणे – आमचा पुनावाला – आमचा पुनावाला पुण्याहून पळाला…… केंद्र सरकार लस पुरवठा…..१८ वर्षे नंतर लसलस करा……४५ वर्षा वरचे जगा की मरा… केंद्र सरकार ची जबाबदारी….. महाराष्ट्र सरकारची जबाबदारी…. माजी मुख्यमंत्री … केंद्राकडुन पैसे आणून द्या…. आमची महाराष्ट्र सरकारची मागणी….. प्रत्येक वेळी मोठा कटोरा…..
अरे!!! सरकार चालवताय का मजाक करताय?
एक मंत्री आहे सरकारात आता तो म्हणतो, १८ जिल्हे कोणाला कोरोना झाला तर घरी क्वारंटाईन नाही करता येणार! कंपल्सरी हॉस्पिटल मध्ये भरती व्हावे लागणार??? मंतुरड्या अरे कोणाला टोपी घालतो??? असे वक्तव्य तू तेव्हाच् करु शकतो, जेव्हा इलाज सगळ्यांचा फुकटात करणार असाल. अरे ! श्रीमंत महाराष्ट्रातील भिकारड्या वृत्तीच्या कटो-यांनो, तुमच्याकडे “लस” विकत घ्यायची औकात नाही, विदेशी “लस” महाराष्ट्रात आणण्याची लायकी नाही आणि गप्पा मारताय, तिस-या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होण्याची शक्यता?????? नवी नौटंकी तिस-या लाटेची, जेणेकरून सगळी खापरं लस वेळेवर मिळत नाही म्हणून दाढीधारी वर फोडायला मोकळे. साहेब, कशापायी महाराष्ट्राला वेठीस धरताय, घरबसल्या…… तुम्हाला माहिती आहे का…..लोकांचे धंदे बुडले……तुमचे ठीक… सात पिढ्यांची पालिका…..पण सामान्य माणसाचं तळहातावर पोट….त्याला काय देणार???? शिवथाळी…. घरपोच…… मोफत….
साहेब, राजकारण्यांच पोट कधीच भरत नसतं……. अब्जावधी रुपये खिशात ओतले तरी त्यांचा खिसा रिकामा असतो…….. सामान्य माणसाचं तसं नाहीये साहेब…… रात्री च्या एकत्र जेवणात सगळ्यांची पोटं भरली, तरी घरधनी समाधानाने रात्री निश्चिंत झोपतो……. साहेब, कोरोनाच्या नावाखाली आणि आपला रिकामा खिसा भरण्यासाठी मात्र तुम्ही सामान्य माणसाची झोप उडवून टाकली….तुमच्या सरकारनं कुठलं चांगलं काम केलं ते तरी सांगा???? हो फकस्त एक पत्र तुम्हाला समयाधीशांनी पाठवले ……. बार, दारु वरचे निर्बंध शिथिल करण्याबाबत….केवढे मोठे पाऊल????? मराठी पाऊल पडते पुढे!!!!!!!! बाकी मसनांत जातील बुढे!!!?
साहेब, कंपांउंडर, भतीजा, समयाधीश , केंद्र सरकारच्या पैशापायी कुढे!!!!
काय गत करून ठेवली महाराष्ट्राची माजी सरकारने महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन ठेवले होते. आम्हाला पारदर्शी कामाची सवय झाली होती. आता मात्र ह्यावेळी सरकार बनवण्यापासुन ते आजतागायत फक्त भ्रष्टाचार!!
आम्हाला वाईट वाटते ते ह्याचे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुढची पिढी बाटली ह्याचे. तुम्ही मराठा समाजाला वेठीस धरता आणि हिरव्या चादरीवर गुडघे मोडुन समोर डोकं टेकवता ह्याचे…. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून महाराष्ट्र जनतेनी तुम्हाला भाजपाला मिळुन सत्तेत आणले, पण तुम्हाला ही गादी हवी होती इतके इरेला पेटला होतात की आणि ह्या गादी साठी, भगव्या गादी ची निर्भर्त्सना करून, सत्याला पायमल्ली तुडवून, असत्याचा संग करीत, बहुमताचा अनादर करीत, मतदारांचा विश्वासघात करीत, त्या जागेवर बसला जिथे बसल्यावर तुम्हाला सरकार कसे चालवतात माहिती नाही? पारदर्शी निर्णय कसे घेतात माहिती नाही. त्यासाठी कुठला सरकारी यंत्रणेचा माणूस कामी लावून जनतेच्या भल्याची कामे, कशी करायची माहिती नाही….
जनतेच्या भल्यासाठी खरोखरच जर कामे करायची असतील, कोरोनाला हारवायचे असेल तर सगळ्यात पहिले स्वतः च्या मनातील कोरोनाची भिती मनातुन काढुन टाका… जनतेच्या समस्या जाणून घ्या… त्यांच्या आर्थिक विवंचनेवर तोडगा काढुन द्या आणि सर्वसामान्य जनतेला कोरोनासाठी वेठीस न धरता, त्यांना मोकळीक द्या.
तुमच्या तिस-या लाटेच्या वक्तव्याने जनता भ्रमित होते, लहान मुलांना होईल असे म्हटल्यावर तुमचे अगाध अज्ञान प्रकट होते. त्यातुन कुठलेतरी कपट भविष्यासाठी पेरुन ठेवल्याचा भास होतो. तुमचे म्हणजे स्वतः चा मुलगा गेला वाया तर जाऊ दे, त्याला नाईट क्लबला जाऊ दे, दारु पिऊ दे…… बॉलिवूड च्या पोरींबरोबर रात्र घालवु दे. ही सर्व केंद्र सरकारची जबाबदारी आहे. मुलांचं लग्न व्हायचं आहे तर काय झालं? मी नातवाचं संगोपन कसं करायचं ह्याच्या तयारीला लागलोय!!!!!!!
असं इंटरनेटवरून शेळ्या हाकुन आणि बाहेर न पडता घरकोंबड्यासारखे घरात बसून – रयतेला तुम्ही न्याय देवू शकत नाही.

भाई देवघरे

Leave a Reply