विकासाचा महामेरू ….

विकासाचा महामेरू
गरीब जनासी आधारू
स्वप्नपूर्तीचा साकारू
नितीनभाऊ गडकरी ।।

पुलकरी , रोडकरी
पोर्टकरी , उद्योगकरी
मिहानचा मानकरी
नितीनभाऊ गडकरी ।।

विकासाचा झंझावात
अडथळ्यांसी करी मात
व्यवस्थापनातला तात
नितीनभाऊ गडकरी ।।

दिलदार दिलखुलास
मैत्रभाव जपतो खास
ठोकतो परी नाठाळास
नितीनभाऊ गडकरी ।।

वैदर्भियांचा अभिमान
नागनगरीची शान
वाढवी राष्ट्र सन्मान
नितीनभाऊ गडकरी ।।

रात्रंदिन एकची ध्यास
सबका साथ सबका विकास
स्वयंसेवकत्वाचा अभिमान ज्यास
ऐसा नितीनभाऊ गडकरी ।।

कवी — अनिल शेंडे।

Leave a Reply