वऱ्हाडी ठेचा …अनिल शेंडे

इंद्राय स्वाहा ! तक्षकाय स्वाहा !

गुरुदेव, बघा तुमच्या बंगालची
काय अवस्था झाली
राज्याच्या प्रमुखावरच
” राम ” म्हणायची वेळ आली !
” भयमुक्त चित्त नि माथा उन्नत “
अशा प्रदेशाची तुमची कल्पना होती
आज तुमच्या त्या स्वप्नांची
तुमच्याच मुलांनी केली माती !
खून,जाळपोळ, मारकाट, बलात्कार
बंगालमधून रोज याचेच समाचार !
जे फिर्याद द्यायला जातात , त्यालाच
पोलीस आरोपी म्हणून अडकवतात !
केंद्रीय मंत्र्यांच्या गाड्यांवर
दिवसाढवळ्या हल्ले होतात !
आणि सामान्य माणसे तर
किडेमाकोड्यागत मारली जातात !
हिंदू म्हणून जगण्याचा
हिंदूंना हक्कच नाही उरला !
दिदीने या केला आहे
लोकशाहीचाच खेला !
राज्याचे रक्षकच इथे
बनले आहेत भक्षक !
आता इंद्रासकटच मारावा लागेल
महाविषारी तक्षक !!

कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply