रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

गोंदिया : २५ मे – माजी पोलिस पाटील असलेल्या शेतकऱ्याचा रानडुक्कराच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील बाघोली शिवारात घडली. धनराज मोहन तुरकर (६८) रा.बाघोली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बाघोलीचे माजी पोलिस पाटील धनराज तुरकर हे गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या आपल्या शेतातील रब्बी पिकाची कापणी करुन घराकडे खैरलांजी मार्गाने परत जात होते. यावेळी बाघोली शिवारात त्यांच्यावर अचानक रानडुक्कराने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान माजी सरपंच रमेश पटले यांनी घटनेची माहिती तिरोडा वनविभागाला दिली असता वनविभागाचे जागीच मुत्यू झाला. तिरोडा वन विभाला माजी सरंपच रमेश कर्मचारी घटनास्थळी झाले व पंचनामा केली. तर दवनीवाडा पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार देवराम खंडाते, कल्पेश चव्हाण करीत आहे. दरम्यान, वनविभाग व शासनाने तुरकर कुटुंबियांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply