गडकरींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा ही संघठन उपक्रम

नागपूर : २५ मे – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सेवा ही संघटन’ असा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मोठय़ाप्रमाणात जीव वाचले. त्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, पूर्व नागपुरात आ. कृष्णा खोपडे, मंडळ अध्यक्ष संजय अवचट यांच्या नेतृत्वाखाली २७ ठिकाणी आयोजित अँन्टिबॉडी शिबिरात २३१७ नागरिकांनी तपासणी करून घेतली. ज्यात ११00 लोकांना प्लाज्मा दानासाठी पात्र ठरविण्यात आले. त्या अंतर्गत १३ ठिकाणी प्लाज्मादान शिबिरे घेण्यात आली. त्यात ३0६ नागरिकांनी प्लाज्मादान केले. ४ शिबिरात १0३ दात्यांनी रक्तदान केले. चांदमारीत १५0 वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, मध्य नागपुरात आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, महापौर दयाशंकर तिवारी, मंडळ अध्यक्ष किशोर पलांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली १२ ठिकाणी ३८६ दात्यांनी रक्तदान केले. शिवाय, विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, ३ हजार वृक्षारोपण, जंतुनाशक वितरण आदी सुरू आहे. गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर पर्यावरण आघाडीचे संयोजक स्वानंद सोनी यांच्या संयोजनात सर्व मंडळात प्रत्येकी ५00 वृक्ष लावले जातील. पूर्व नागपुरात २७ मेपर्यंत १८ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. २७ मे रोजी येथे ३ ठिकाणी मुखाच्छादन व जंतुनाशक वितरित केले जातील. पूर्व नागपुरात ५00 वृक्षारोपण करण्यात येईल. तसेच, पश्चिम, उत्तर व दक्षिण- पश्चिम मंडळात २७, २८, २९, ३0 मे रोजी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. दक्षिण नागपुरात आ. मोहन मते, मंडळ अध्यक्ष देवेन दस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली ४ प्लाज्मा दान शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत २४६ नागरिकांनी प्लाज्मादान केले. ५ रक्तदान शिबिरातून ५१0 युनिट रक्त गोळा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply