वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे

आंतरराष्ट्रीय तमाशा !

हे औषधी पेशातले लोक
आपल्याच हाताने आपलं हसू करून घेतात !
आधी ज्याला जीवनरक्षक म्हणतात
त्यालाच नन्तर निरुपयोगी ठरवतात!
आधी कोरोनावर रेमडेसिव्हीर रामबाण म्हणून ,
त्यासाठी धावाधाव करायला लावलं !
काळ्या बाजारातून साठ साठ हजारांत घ्यायला लावलं ! आणि,
त्यालाच आता बिनकामाचं ठरवलं!
मग प्लाझ्मा थेरपीची तशीच थेरं झाली !
आता तीही त्यांनी बाद केली !
या मंडळींच्या असल्या खेळांपायी
कुटुंबेच्या कुटुंबे अक्षरशःदेशोधीला लागली !
पण,यांना काय त्याचं ?
यांनी आपली उखळं पांढरी करून घेतली !
आता दोन लसीतील अंतरासाठी
वेगळाच तमाशा !
आधी चार, मग सहा ते आठ आणि
बारा ते सोळा म्हणतात आताशा !
अरे , माणसं म्हणजे तुम्हाला काय
गिनीपिग वाटली ?
प्रयोग करत जायचे ! खिसे भरत जायचे !
माणसं काय ,जगली तर जगली,अन मेली तर मेली !

  कवी -- अनिल शेंडे ।

Leave a Reply