जुगार अड्ड्यावर छापा टाकून २८ जुगार्यांना अटक

अकोला : २४ मे – गायगाव येथील शेतशिवारात आज विशेष पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात 28 आरोपींना अटक करण्यात आली. यात होंडासिटी, बुलेट अशा गाड्या घेऊन जुगार खेळण्यास आले होते. त्यांच्याकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वरळी अड्डे, जुगार सुरु असून त्याची प्रचिती आज गायगाव येथील एका शेतातील बंद घरात आली. उरळ येथील प्रकाश वानखडे यांच्या शेतात हा जुगार सुरु होता. याबाबत माहिती झाल्यावर पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने तेथे छापा टाकला.तेव्हा शेतातील बंद खोलीमध्ये 28 आरोपी आढळून आलेत.त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची रोकड,12 मोटरसायकल व 1 बुलेट किंमत 6 लाख रुपये व चारचाकी वाहन होंडा सिटी किंमत 7 लाख रुपये व इतर जुगाराचे टेबल खुर्चा साहित्य असा एकूण 17 लाख रूपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. या प्रकरणात वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या मध्ये अली खा नुरे खा, श्याम नरेंद्र हेडा, नितीन तुळशीराम चिलात्रे, रहिमान खा हुसेन खा, रामभाऊ किसन सांभारे, संजय इंगळे, अनिल चांडक, संजय धनोकार, मोहन गुलानी, सुधीर पिंपळकार, जहिर खान आझाद खान, मोहन पौळ, रमेश हरसुलकर, मदन घाटोळे, नितीन दिनवाले, मो.अजीज मो.इस्माईल, गणेश इंगळे, अंकुश इंगळे यांच्यासह इतरांचा समावेश होता.

Leave a Reply