गाईच्या पोटातून काढले ८० किलो प्लास्टिक

नागपूर : २३ मे – कचरा हा डस्टबिनमध्येच टाका असे वारंवार आवाहन करण्यात येते. प्लास्टिकचा वापर करणे थांबवा असेही सांगण्यात येते. परंतु, काहींचा निष्काळीपणा या जनावरांच्या जीवावर उठला आहे. अशीच एक घटना शहरात उघडकीस आली असून एका गाईच्या पोटातून तब्बल ८0 किलो प्लास्टिक आणि कचरा काढण्यात यश आले आहे. गोभक्त सुनील मानसिंगका यांच्या जागरुतेमुळे या गाईला नवे जीवनदान मिळाले तर या गाईवर गोरक्षण येथे पुढील उपचार सुरू आहे.
कचरा कुठेही टाकूण देण्याची काही नागरिकांची जुनी सवय अद्यापही मोडली नाही. घरातील अन्न हे प्लास्टिकच्या पिशवित टाकून अलगद घराबाहेर टाकण्यात येते. दरम्यान, अन्नाच्या शोधात गाई या ते अन्न प्लास्टिकसह खाऊन टाकते. याचा त्यांना पुढे जाऊन त्रास होतो. एका गाईच्या पोटातून ८0 किलो प्लास्टिक निघणे याचा कुणी साधा विचारही करू शकत नाही. परंतु, ही वास्तविकता असून नागरिकांनीही आता आपल्या काही सवई बदलण्याची गरज आहे. किंबहुणा आपल्या काही निष्काळीपणामुळे कुणाच्या जीवावर बेतणार असेल असे वर्तन तरी तत्काळ थांबविण्याची गरज आहे. महाल परिसरातील बडकस चौकात असलेले सुनील मानसिंगका नित्यनेमाने गायीला गोग्रास देतात. विहिंपच्या गोरक्षा विभागाचे केंद्रीय मंत्री असलेले मानसिंगका यांचे परिसरातील गाईंकडे लक्ष असते. दरम्यान पोट फुगलेली एक गाय त्यांच्या निदर्शनास लक्षात आली. रवंथ केलेला चारा तिच्या नाक व तोंडावाटे बाहेर पडत होता. त्यांनी पशुवैद्यकाला गाईला दाखवले असता पोटात जमा झालेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पोट फुगले असून शस्रक्रियेद्वारे कचरा बाहेर काढता येईल, असे सांगितले. त्यानंतर गोरक्षण सभा धंतोली येथील गोरक्षण सभेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. मयूर काटे व त्यांच्या सहकारी पशुधन पर्यवेक्षक शेखर मेर्शाम व मुकेश चवरे यांनी शस्रक्रिया करून ८0 किलो प्लॅस्टिक पिशव्या काढल्या. यासाठी गोरक्षण सभेचे हर्षल आर्वीकर, सुमित माईकर व आशीष कावळे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply