नागपूर : २३ मे – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाला आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात २०३० नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पूर्व विदर्भात ४०५६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर राज्याच्या उपराजधानीत आज १०४२ नवी बाधित रुग्ण आढळून आले असून २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर २३२६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
नागपूर शहरात गेल्या २४ तासात १०४२ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या हि शहरातील रुग्णांपेक्षा जास्त दिसून आली आहे. शहरात ३०० रुग्ण आढळून आले असताना ग्रामीण भागात ७३२ रुग्णांची नोंद झाली आहे तर १० जिल्ह्याबाहेरील रुग्णांची नोंद करण्यात आली आहे शहराची एकूण रुग्णसंख्या आता ४७१०५९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आज २४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यातील ७ शहरातील ७ ग्रामीण भागातील तर १० रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या आता ८७६८ वर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासात शहरात १८०१६ चाचण्या घेण्यात आल्या असून ५८५१ चाचण्या ग्रामीण भागात तर १२१६५ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. आज २३२६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४४८३५७ वर पोहोचली आहे तर बरे होण्याचे प्रमाण ९५.१८ टक्क्यांवर गेले आहे. शहरात सध्या १३९३४ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यातील ६६२२ ग्रामीण भागात तर ७३१२ शहरातील रुग्ण आहेत.