लखनऊ : २१ मे – प्रेमात लोक काय काय करतील याचा काही नेम नसतो. अनेक जण आपल्या प्रेमासाठी कित्येक मैलाचा प्रवास करतात, तर काही घरच्यांचा नकार झुगारुन प्रेमासाठी वाट्टेल ते करतात. कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येही अशा अनेक घटना समोर आल्या. अशीच एका घटना समोर आली आहे, ज्यात एक तरुण आपल्या प्रेमासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला आहे.
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे. एक प्रेमी आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी अडून होता, यातचं तो फिल्मी अंदाजात अनेक फूट उंच असलेल्या मोबाईल टॉवरवर चढला. लग्नासाठी नकार दिल्यास, टॉवरवरुन खाली उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर प्रेयसीने ‘हो’ म्हटल्यानंतर तो खाली आला.
स्थानिकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटानास्थळी दाखल होत, त्या तरुणाला समजावलं आणि त्याच्या कुटुंबियांकडे सोपावलं. त्या तरुणाचं वय 19 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होतं. या तरुणाने त्या मुलीशी लग्न करण्यासाठीचा प्रस्ताव तिच्या घरी मांडलाही होता. परंतु मुलीकडील कुटुंबिय या लग्नासाठी तयार नव्हते.
त्यामुळे रागात त्याने मोबाईल टॉवरवर चढून असा हायवोल्टेज ड्रामा केला आणि लग्न न लावून दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. घटानास्थळी असेलल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला.
या सगळ्या हायवोल्टेज ड्रामानंतर तरुणाने आणखीन एक ड्रामा केला. मुलीने लग्नासाठी होकार दिल्यानंतर तो टॉवरवरुन खाली तर, आला पण आता खाली आल्यानंतर घरच्यांकडून मार खावा लागेल, या भीतीने खाली उतरल्यानंतर त्याने बेशुद्ध झाल्याचं नाटक केलं. परंतु पोलिसांनी त्याला समजावलं आणि पुन्हा असं न करण्याचा सल्ला दिला.
याप्रकरणी बोलताना एसीपी अरविंद कुमार यांनी सांगितलं, की तो तरुण पूर्णपणे सुरक्षित असून त्याला कोणतीही ईजा झाली नाही. या तरुणाने याआधीही अशाप्रकारचं कृत्य केलं आहे. यापूर्वी त्याने ब्लेडने स्वत:ला जखमी केल्याची माहिती तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.