माणसाचा बच्चा … !
लांडग्याचा बच्चा लांडगाच होतो
डुकराचा बच्चा डुक्करच होतो
पण माणसाचा बच्चा मात्र
लांडगा, डुक्कर, गिधाड, घुबड
काहीही होऊ शकतो !
कोव्हिड रुग्णालयातील मृतकांचे
मोबाईल , घड्याळ , पर्स , अंगावरील दागदागिने आदि समान चोरणाऱ्यांना
पाहिलं, कि हा समज पक्का होतो !
खरंच या महापुरुषांना यापैकी कुणाची उपमा द्यावी ?
नातेवाईकांना शव परत नकरण्याच्या
व्यवस्थेचा असा फायदा उपटणाऱ्या
या सज्जनांची ( ! )संभावना
खरंच कोणत्या शब्दात करावी ?
प्रेतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या
या मानवतेच्या मारेकऱ्यांना
कोणत्याही प्राण्याची उपमा , हा
त्या प्राण्याचाच उपमर्द होईल !
खरंच , माणसा !
तुझ्यामधे माणूसपण कधी रे येईल ?
कवी -- अनिल शेंडे .