परमवीर सिंहांची तक्रार करणारे देवेंद्र भोजे यांचे सीबीआय महासंचालकांना पत्र

अमरावती : २० मे – राज्यातील पोलीस दलातील बदल्या आणि ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात चर्चेत आलेले येथील पोलीस आयुक्तालयात कार्यरत पोलीस कर्मचारी देवानंद भोजे यांनी थेट सीबीआय महासंचालकांना पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणात आपली चौकशी करावी आणि सर्व तथ्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी केली आहे.
‘फोन टॅपिंग’ प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवण्यात आले असून सातत्याने होत असलेल्या बदनामीमुळे आपण त्रस्त झालो आहोत. त्यामुळे कु टुंबासह आत्महत्येचे विचार मनात येत आहेत, असे देवानंद भोजे यांनी सीबीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. देवानंद भोजे हे सध्या पोलीस आयुक्तालयात उच्च श्रेणी लघुलेखक पदावर कार्यरत आहेत.
आपले गृह मंत्रालयात स्थानांतरण करण्यात आले होते. पण, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत आपण एकही दिवस काम के लेले नाही. अनिल देशमुख यांच्या लघु लेखक आणि स्वीय सहायकपदी आपल्या बदलीचे आदेश झाले होते. पण, आपण या पदावर एकही दिवस कार्य के लेले नाही. याच दरम्यान आपली पुन्हा बदली झाली. तरी देखील या प्रकरणात आपल्याला विनाकारण त्रास दिला जात आहे, असे देवानंद भोजे यांचे म्हणणे आहे. सध्या भ्रष्टाचार प्रकरणात अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आपलाही संबंध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आपण त्रस्त झालो आहोत. माझ्याशी संबंधित प्रकरणाचे संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी सीबीआयने आपलीही चौकशी करावी, अशी मागणी आपण के ली आहे. अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकपदी बदली झाल्यानंतर त्याचा आधार घेत काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपली बदनामी चालवली आहे. बदल्यांच्या प्रकरणातही आपल्याला गोवण्यात आले. त्यामुळे माझे कु टुंब मानसिक दबावाखाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे तथ्य जनतेसमोर यावे, याच उद्देशाने आपण वरिष्ठांच्या परवानगीने सीबीआयला पत्र दिले आहे, असे देवानंद भोजे यांनी सांगितले.

Leave a Reply