जमिनीचे गैरव्यवहार केल्याप्रकरणी बिल्डरला अटक

नागपूर : २० मे – बनावट सातबारा उतारा तयार करणे, नोंदणीकृत विकीपत्राद्वारे विकलेले प्लॉट पुन्हा इतर व्यक्तींना विकून केलेल्या मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टॅण्डींगनुसार कोणताही परतावा न करता एकूण ३३ कोटी ५६ लाख रुपयांची फसवणूक करणार्या मे. जगदंबा रियलेटर्स प्रा.लि. चे प्रमुख गोपाल लक्ष्मण कोंडावार यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल कोंडावर यांनी फिर्यादी प्रतिभा नीलकमल महतो (वय ५८ वर्षे रा. १४३, नर्मदा कॉलनी, काटोल रोड, नागपूर) यांच्याशी वर्ष २0१४ मध्ये मौजा मांगरूळ येथील खसरा नंबर १0६/२, १0७/२ प्लॉट क्रमांक २९६ व ३१५ व त्यानंतर २९ मार्च २0१४ मध्ये मौजा मंगरूळ येथील प्लॉट क्रमांक ३0४ व ३0५ ची नोंदणीकृत विकीपत्राद्वारे चारही भूखंडाचे विकीपत्र त्यांच्या कंपनीचे संचालकांकडून नोंदणीकृत केले. त्यानंतर आरोपी गोपाल कोंडावार याने फिर्यादी यांना मेंमोरॅन्डम ऑफ अंडरस्टॅण्डींग करून दिले. त्यामध्ये ३६ महिन्यानंतर तेच प्लॉट दुप्पट किंमतीत पुन्हा विकत घेणार असल्याबाबत आश्वस्त केले. तसेच फिर्यादीस बनावट ७/१२ तयार करून दिला. मेमोरेंडम ऑफ अंडरस्टॅण्डींगनुसार ३६ महिन्यानंतर फिर्यादी व तिचे पती यांनी आरोपीस प्लॉट परत विकत घेण्याबद्दल विनंती केली असता आरोपी गोपाल कोंडावार यांनी टाळाटाळ केली. त्यावरून फिर्यादी यांनी नमूद प्लॉट स्वत: दुसर्यांना विक्री करण्याचे ठरवून प्लॉटची पाहणी केली असता त्यांच्या प्लॉटच्या जागेवर दुसर्याचे घर आढळून आले. तसेच त्यांनी गोपाल कोंडावार यांच्याकडून विकत घेतलेले सर्व प्लॉट हे आरोपींनी दुसर्या व्यक्तींना विकल्याची माहिती तलाठी कार्यालयातून प्राप्त झाली. अशाप्रकारे नमूद गुन्हय़ातील आरोपीनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट सातबारा उतारा तयार करून तो फिर्यादी यांना दिला व फिर्यादी सोबत नोंदणीकृत विकीपत्राद्वारे विकलेले प्लॉट पुन्हा इतर व्यक्तींना विकून फिर्यादीसोबत केलेल्या मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टॅण्डींगनुसार कोणताही परतावा न करता एकूण ३३ कोटी ५६ लाख रुपयांची फसवणूक केली. या गुन्हय़ाचा तपास पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी यांचे निर्देशान्वये पोलिस उपायुक्त (आर्थिक) विवेक मासाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक शरयू देशमुख व त्यांची तपास चमू सफौ रमेश चिखले, पोहवा गजानन मोरे व सोबत नापोशी भारती माडे करीत आहे.

Leave a Reply