युद्धविशारद कोरोना !
अरे हा कोरोना लेकाचा
युद्धविशारद वगैरे आहे कि काय !
अगदी नियोजनबद्ध पद्धतीने तो
पसरतोय आपले पाय !
पहिला हल्ला त्याने
ज्येष्ठ नागरिकांवर केला
दुसऱ्या पर्वात त्याने
तरुणांवर पाश टाकला !
तिसऱ्या पर्वात म्हणे त्याची
बालकांवर दृष्टी आहे !
आणि चवथ्या पर्वामधे त्याच्या
प्राणीसृष्टी आहे !
इतकं सुंदर नियोजन तर
भल्याभल्या सेनापतींनाही नाही जमत !
आणि कुठलंही शिक्षण न घेता
हा चपटा चिनी करतोय आपली हजामत !
कवी -- अनिल शेंडे .