मुंबई : १९ मे – ‘भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवून नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
केंद्राने खताच्या किंमतीत वाढ केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवून नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी गडकरी यांच्या विरोधात लढलो, त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती म्हणून आनंद आहे, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.
‘केंद्र सरकारने खत दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्तावर उतरले. तहसील कार्यालय येथे घंटानांद केला जाईल. केंद्र सरकारला जाणीव करून द्यावे यासाठी आंदोलन काँग्रेस करेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिली.
‘तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक भागात नुकसान झाले आहे. मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार आणि अस्लम शेख हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे’, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.