बलात्काराच्या दोन घटनांनी नागपुरात खळबळ

नागपूर : १९ मे – खुनाच्या गुन्ह्य़ासह इतरही गुन्हे दाखल असलेल्या २0 वर्षीय आरोपीने त्याच्या १४ वर्षांच्या अल्पवयीन प्रेयसीवर तिच्याच घरी अत्याचार केल्याची घटना पारडी हद्दीत घडली. मयुर मुन्नेश्वर नागदेवे असे आरोपीचे नाव आहे. तर दुसर्या घटनेत जरीपटका हद्दीत एका १५ वर्षांच्या मुलाने ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली. या घटनांमुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेली विकृती स्पष्ट होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पारडी हद्दीत राहणारा मयुर नागदेव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाठोडा पोलिस ठाण्यात खून आणि चोरीचा गुन्हा दाखल आहे. तो राहात असलेल्या वस्तीत एका मित्राकडे त्याचे येणे-जाणे होते. दरम्यान, त्याने त्याच वस्तीत राहणार्या १४ वर्षीय मुलीला पिण्यासाठी पाणी मागितले आणि तेव्हापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. मुलीचे आई वडील चहा-नाश्त्याचा ठेला चालवितात. त्यामुळे ते कामावर असायचे आणि मुलगी शाळा बंद असल्याने घरीच असायची. मुलगी घरी एकटी असल्याने मयुर वॉल कंपाउंडवरून उडी घेत नेहमी तिला भेटायला जायचा. दोघांचेही चांगलेच सुरू होते. दरम्यान, १२ एप्रिलला दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे प्रेयसीला भेटायला आला होता. ती घरी एकटीच होती. त्यांच्यात शरीरसंबंध सुरू होते. तेवढय़ात मुलीची आई घरी आली. तिने मुलीला आणि मयुरला तशा अवस्थेत पाहताच आरडाओरड सुरू केली. यामुळे दोघेही घाबरले. पण, सराईत गुन्हेगार असलेल्या मयुरने ‘मी आधीच एकाला टपकवले, तुम्हाला पण टपकवीन,’ अशी मुलीच्या आईला धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने पारडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पारडी पोलिस ठाण्यात पोक्सो अँक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply