रुग्णसंख्येत वाढ, उपराजधानीत ११८९ बाधित, ४१ मृत्यू तर ४०७३ कोरोनामुक्त

नागपूर : १८ मे – पूर्व विदर्भात कोरोनाची लाट ओसरत असतानाच नागपुरात आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. पूर्व विदर्भात आज २६७८ रुग्ण आढळून आले आहेत तर ७०७० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासात पूर्व विदारबत ८५ रुग्णांच्या मुत्यूची नोंद झाली आहे. तर राज्याच्या उपराजधानीत आज ११८९ रुग्णांची नोंद झाली असून ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४०७३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
गेल्या २४ तासात नागपुरात ११८९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत एकूण बाधितांचा आकडा आता ४६५४०३ वर पोहोचला आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये ५८६ रुग्ण ग्रामीण भागातील, ५९१ रुग्ण शहरातील तर १२ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. आज ४१ बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यातील १५ ग्रामीण भागातील १४ शहरातील तर १२ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. तर एकूण मृत्युसंख्या आता ८६२१ वर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासात नागपुरात १७१९७ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ५९४८ ग्रामीण भागात तर ११२४९ चाचण्या शहरात घेण्यात आल्या. गेल्या २४ तासात ४०७३ रुग्ण कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४३२८१७ वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण आता ९३.०० टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या शहरात २३९६५ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यातील १२०८७ ग्रामीण भागात तर ११८७८ शहरातील रुग्ण आहेत.

Leave a Reply