नागपुरात सुरु आहे सुपर स्प्रेडर्सची चाचणी

नागपूर : १७ मे – नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या घटली असली तर चिंता कायम आहे. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागपूर महापालिकेकडून बाजारपेठा, बँक, शासकीय आणि खासगी कार्यालये, दुकाने इत्याठी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर्स’ची कोरोना चाचणी करण्यात आलीय. महापालिकेच्या १० झोनमध्ये ही चाचणी केली गेली. यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ६ हजारापेक्षा जास्त नागरिकांची चाचणी करण्यात आली. यासाठी ११ मोबाईल व्हॅन आणि ४५ चाचणी केंद्रांचा उपयोग करण्यात आला.
महापालिकेकडून सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पथकासह व्यतिरिक्त आता नवे १० पथकं चाचणीसाठी तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून लहान मुलं, मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे. नागपुरात मधल्या काळात कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक बनली होती. तसंच मृत्यूचं प्रमाणही भीतीदायक बनलं होतं. पण आता परिस्थिती काहीशी आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशावेळी महापालिकेकडून खबरदारी म्हणून सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात येत आहे.

Leave a Reply