आधार रुग्णालय हे कोरोना रुग्णांचा आधार बनेल – देवेंद्र फडणवीस

बुलढाणा : १७ मे –कोरोना महामारीच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांना आधाराची गरज असतांना आ. श्वेता महाले यांनी आधार कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना मोफत उपचार केले जाणार असल्याने आ.श्वेता महाले यांच्या प्रयत्नांने सुरू झालेल्या हे आधार रुग्णालय रुग्णाचे आधार बनेल असा आशावाद माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखली येथे आधार कोविड केअर सेन्टरच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला .
चिखली येथे आ. श्वेता महाले यांच्या प्रयत्नांने व लोक सहभागातून स्व दयासागर महाले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सुरू झालेल्या आधार कोविड केअर केंद्राचे उदघाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले . यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे , राज्य भाजपा उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ संजय कुटे , जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर , माजी आ चैनसुख संचेती, माजी आ विजयराज शिंदे , नगराध्यक्ष प्रिया बोन्द्रे, सभापती सिंधूताई तायडे , उपनगराध्यक्ष सौ नजिरा बी शे अनिस , उपसभापती सौ शमशाद बी शाहिद पटेल, सतीष गुप्त, नगरसंचालक शरद भाला, डॉ. प्रतापसिंह राजपूत, अॅॅड. विजय कोठारी, रामकृष्ण शेटे, पंडितराव देशमुख, डॉ.कृष्णकुमार सपकाळ, सभापती सौ.ममताताई बाहेती, सौ.विमलताई देव्हडे, गोविंद देव्हडे, नामु गुरूदासानी, यांची उपस्थिती होती .
फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा पीएसए प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील सर्व पिएसयु च्या मदतीने देखील देशात ऑक्सिजन प्लांट उभे राहत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ऑक्सिजनची कमतरता पूर्णपणे दूर होईल . केंद्र सरकारने कोरोना काळात महाराष्ट्राला सर्वात जास्त मदत केली असून रिमडेसिवीरचा सर्वात जास्त पुरवठा महाराष्ट्राला केला आहे, ऑक्सिजन चा सर्वात जास्त पुरवठा महाराष्ट्राला केला आहे तसेच व्हेंटिलेटर चा सुद्धा सर्वात जास्त पुरवठा महाराष्ट्राला केला आहे. या कठीण काळात आपण सर्वांनी कोणताही भेदभाव न ठेवता, सर्वांनी सोबत येऊन प्रत्येक रुग्णांच्या मागे उभं राहून कोरोनाला हरवायचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
स्व दयासागर महाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरू करण्यात येत आहे . गेल्या एका वर्षापासून आपण कोरोना च्या संकटाने त्रस्त आहोत. चिखली येथील बहुतांश रुग्ण हे औरंगाबाद, अकोला व बुलडाणा येथे उपचारासाठी जातात. आधार रुग्णालय राज्यात आदर्श कोविड सेंटर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने प्रतिपादन आ. श्वेता महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना केले . कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने अतिशय मोजक्या लोकांमध्ये करण्यात आला . कोरोनाच्या नियमाप्रमाणे सामाजिक अंतराचे पालन करून आणि कोणतीही गर्दी न करता कार्यक्रम पार पडला .आधार सेंटरला 20 ऑक्सिजन तर 50 सर्वसामान्य खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे .

Leave a Reply