मृदुल घनोटे विदर्भात प्रथम

नागपूर : १६ मे – महाल येथील रमैश चांडक इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. मृदुल मोहन घनोटे ही उर्जा ब्रेन अरिथमँटीक तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अबँकसच्या चतुर्थ स्तरीय परिक्षेत १००% गुण प्राप्त करुन विदर्भात प्रथम स्थान प्राप्त केले आहे.
उर्जा ब्रेन अरिथमँटिक द्वारे आजपर्यंत घेण्यात आलेल्या सर्व स्तरिय परिक्षांमध्ये कु. मृदुलने सर्वोच्च १००% गुण प्राप्त करित ती प्रथम आली आहे.
आता चतुर्थ स्तरीय परिक्षेतही तिने आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे .
तिने आपल्या यशाचे श्रेय आई -वडील , बहिण राष्ट्रपती पुरस्कार २०१० प्राप्त व २०१९ मध्ये दहावीत विदर्भ टाँपर मैत्रेयी, उर्जा ब्रेन अरिथमँटीकचे संचालक हितेश आदमने, रोशन काळे, स्व. रमैश चांडक इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य अपर्णा डे, उपप्राचार्य आरती सेनाड, वर्गशिक्षिका दीपा शुक्ला, अर्चना रेवतकर, कीर्ती राऊत आणि अन्य शिक्षकांना दिले आहे.

Leave a Reply