नागपूर : १६ मे – नागपूर विदर्भात झपाट्याने पसरणाऱ्या व कोरोनानंतर होणाऱ्या फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने तज्ञ डॉक्टर तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी मिळून एक कृती आराखडा (ऍक्शन प्लॅन) तयार केला आहे. गडकरींनी या संदर्भात एक बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत हा कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी पावले उचलली जातील. या रोगावर महाग औषधांवर पर्याय, उपचारासाठी सुविधा वाढवणे, यावर या बैठकीत चर्चा झाली.
बैठकीला विभागीय आयुक्त संजीवकुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, खा. डॉ. विकास महात्मे प्रामु‘याने उपस्थित होते. ब्लॅक फंगलचा प्रादुर्भाव डोळे, नाक, जबडा, मेंदू, सायनस येथे होत आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या आजाराने नागपुरात शेकडो रुग्णांना ग्रासले आहे. या आजारावर एम्फोटेरिसीन बी, पोसस्कॅनाझोल व इसूकूना झोल या औषधाचा मु‘यतः उपयोग होतो. या औषधांची मागणी कमी असल्यामुळे ही औषधे बाजारपेठेत कमी उपलब्ध आहेत. १५ दिवसांत या औषधांची मागणी वाढल्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला. राज्यात भारत सिरम कंपनी या औषधांचे उत्पादन करते.