पूर्व विदर्भात कोरोना बाधितांसह, रुग्णांच्या मृत्यूमध्येही घट

नागपूर : १६ मे – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे असे म्हणता येईल. आज रुग्णसंख्येसह मृत्युसंख्येतही बरीच घट दिसून आली आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही बाधितांपेक्षा चार पटीने जास्त असल्याचे दिसून आले आहे. आज पूर्व विदर्भात २७०७ रुग्णांची नोंद झाली असून ८०२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्याच्या उपराजधानीत ११३३ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून ४५१९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पूर्व विदर्भातील परिस्थिती आता काहीशी नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे तर बाधित रुग्ण झपाट्याने बरे होताना दिसून येत आहेत. आज पूर्व विदर्भात २७०७ रुग्णांची नोंद झाली आहे त्यात नागपूर ११३३,भंडारा ९६, चंद्रपूर ६७४, गोंडी १२७, वर्धा ४२७, तर गडचिरोलीत २५० रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृत्यू नागपुर ३०, भंडारा ४, चंद्रपूर २०, गोंदिया ७, वर्धा २, तर गडचिरोलीत ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर शहरात गेल्या २४ तासात ११३३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यात ७२६ रुग्ण शहरातील, ३९६ रुग्ण ग्रामीण भागातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. तर नागपूर शहरात आज १५५५४ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या शहरात २९८४३ ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ४६३२४३ वर पोहोचली आहे तर कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ४२४८५० वर पोहोचली आहे. तर एकूण ८५५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply