चक्रीवादळाचा पुण्याला तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, झाडांचीही पडझड

पुणे : १६ मे – अरबी समुद्रावर घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाचा परिणाण आता तळकोकणात दिसू लागला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. रस्ते बंद झाले असून गावांचा संपर्क तुटला आहे. वादळाचा परिणाम काल रात्रीपासूनच पुण्यातही दिसू लागला आहे. रात्री पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसही पडला. आजही पुण्यात जोरदार वारे वाहत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुण्यातही झाडांची पडझड झाली आहे.
सोसाट्याच्या वारा आणि पावसामुळे पुण्यातील विविध भागांत झाडांची पडझड झाली आहे. पुण्यात काल रात्री 9 वाजल्यापासून ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत तब्बल 31 झाडांची पडझड झाली आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाहीये. वादळाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी सर्व अधिकारी आणि जवानांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
तौत्के चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि आसपासच्या परिसरात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह काही भागांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह लहक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply