वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

हल्ली आपल्या देशात झालाय
गावठी शात्रज्ञांचा सुळसुळाट !
त्यांच्या कल्पनाशक्तीचा वारू
सुटलाय, करत हास्याचाखळखळाट!

एक म्हणतो खा चॉकलेट
आणि घालवा स्ट्रेस !
दुसरा विद्वान म्हणतो
मांसाहार करा वाढवा इम्युनिटी बेस!

एका डॉक्टरने तर खूपच कमाल केली !
त्याने म्हणे देशी दारूने कोरोनावर मात केली !

एक मंत्री म्हणतो, कोरोनाही जीव आहे !
त्यालाही नक्कीच जगण्याचा अधिकार आहे !

भय, भीतीच्या वातावरणात
करमणूक ही हवीच असते !
लक्षात ठेवा सर्कशीत
विदूषकाचं मूल्य कमी नसते !

कवी -- अनिल शेंडे।

Leave a Reply